{tocify} $title={Table of Contents}
महाराष्ट्र समावेशित शिक्षण व्यावसायिक संघ ध्येय / उद्दिष्टे (मराठी)
समावेशनाकडून शिक्षणाकडे या तत्वांवर मार्गक्रमण व विचार मंथन करणारा शैक्षणिक समूह आहे. Maharashtra Association of Inclusive Education Professional (#MAIEP) महाराष्ट्र 'समावेशीत शिक्षण' व्यावसायिक संघ हा समावेशीत शिक्षण (#InclusiveEducation) क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यावसायिकांनी एकत्र येऊन केलेला समूह आहे.
महाराष्ट्र समावेशित शिक्षण व्यावसायिक संघ खालील ध्येय व उद्दिष्टे यांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन झाला आहे.
- समावेशित शिक्षण क्षेत्रात कार्यरत व्यावसायिकांचे एकसंघ जाळे तयार करणे व त्यांचे या क्षेत्रातील सक्षमीकरण करणे.
- समावेशित शिक्षण व्यावसायिकांचे समावेशित शिक्षणाकडून शिक्षणाकडे या बाबतच्या दृष्टीकोनातून विचारांची देवाणघेवाण करणे.
- प्रत्येक वर्षी समावेशित शिक्षणातील व्यावसायिकांचे उचित कार्यगौरव / कार्यसन्मान करणे.
- समावेशित शिक्षण व्यावसायिकांचे तसेच प्रत्यक्ष दिव्यांग बालकांचे बळकटीकरण व सक्षमीकरण बाबतीत सहाय्य करणे/सल्ला देणे.
- शासनाच्या धोरणांची समान अमंलबजावणी समावेशित शिक्षण व्यायसायिकांच्या बाबतीत होण्यासाठी सहाय्य करणे/ सल्ला देणे.
- समावेशित शिक्षण क्षेत्रातील ज्ञान, कौशल्य संशोधन याबाबतीतील वार्षिक अहवाल, अंक, बातमीपत्र, संशोधन पत्र, प्रसिद्ध करणे.
- समावेशित शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघाशी समन्वय ठेऊन जाळे विकसित करणे.
- राज्यातील ज्या भागात अजूनही समावेशित शिक्षण पोहचले नाही तेथे समावेशित शिक्षण व्यावसायिक यांच्या सेवा प्रदान करण्यासाठी कृती आराखडा तयार करणे.
- समावेशित शिक्षणाबाबत शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शासकिय यंत्रणा यांच्यासाठी व्याख्याने, कार्यशाळा, सभा व प्रदर्शन यांचे आयोजन करणे.
- समावेशित शिक्षण क्षेत्रात सामाजिक व व्यावसायिक आव्हाने ओळखून गरजेनुसार कार्य करणे तसेच निधी उपलब्ध करून देणे.
- याशिवाय शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी व शैक्षणिक विकासासाठी कार्य करणे.
****
Maharashtra Association of Inclusive Education Professionals (MAIEP) Aims & Objectives (English)
The Maharashtra Association of Inclusive Education Professionals (MAIEP) has been formed to implement the following objectives:
- To develop a network amongst Inclusive Education professionals and personnel to strengthen the field of Inclusive Education.
- To share and exchange views of Inclusive Education professionals about the way of Inclusive Education to Education.
- To organize a meet of professionals every year and present award & honours for their contributions in the field based on qualification, experience and working areas.
- To do advocacy for the benefit and welfare of Inclusive Education professionals as well as for Children / persons with disabilities.
- To do advocacy for equal implementation of Govt. policies for Inclusive Education professionals of the states.
- To publish annual report, magazine, bulletins and journals to undertake knowledge and skills in the field of Inclusive Education.
- To develop networking with national and international associations of the field of Inclusive Education.
- To plan and work for extending professional services to unreached people in different parts of the State.
- To organize seminars, workshops, conferences and exhibitions in different part of the country to acquaint people about Inclusive Education.
- To raise funds for various social and professional issues and work towards them as per needs of Inclusive Education.
- To do all other lawful things which are Qualitative Education and Development on Education to the said objectives.
****