राज्यस्तरीय समताभूषण पुरस्कार 2021

 

राज्यस्तरीय समताभूषण पुरस्कार 2021

राज्यस्तरीय समताभूषण पुरस्कार 2021

                     🏆

 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

#happyteachersday2021 

महाराष्ट्र समावेशित शिक्षण व्यावसायिक संघाच्या #MAIEP च्या वतीने नुकताच राज्यस्तरीय समताभूषण पुरस्कार २०२१ जाहीर करण्यात आला. 

★ समतेची कास धरून शहरी - ग्रामीण व  दुर्गम भागामध्ये जाऊन सेवा देणे, 

★ वंचित घटकातील दिव्यांग मुलांसाठी केलेले काम, 

★शिक्षणासाठी दिशा देणारे नवोक्रम, 

★प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणारे कार्य या समग्र कार्याच्या सन्मानार्थ दिला जाणारा राज्यस्तरीय समताभूषण पुरस्कार  शिक्षक दिनाचे औचित्य साधून जाहीर करण्यात आला.

राज्यभरातील समावेशित शिक्षणासाठी काम करणाऱ्या (राज्य समन्वयक, जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक, केंद्र समन्वयक) व्यावसायिकासाठी दिला जाणारा मानाचा पुरस्कार वरील व्यावसायिकाना जाहीर करण्यात आला. सदरील पुरस्कार लवकरच एका विशेष कार्यक्रमात दिला जाणार आहे.

राज्यभरातुन प्रस्ताव सादर केलेल्या, उत्स्फूर्तपणे सादरीकरण करणाऱ्या आणि पुरस्कार प्राप्त व्यावसायिकांचे महाराष्ट्र समावेशित शिक्षण व्यावसायिक संघाच्या वतीने करावे तेवढे कौतुक कमी. समावेशनाच्या या निरंतर प्रक्रियेत असेच अमूल्य योगदान पुढेही मिळत राहो यासाठी अनेक अनेक शुभेच्छा 💐💐.

          कोअर कमिटी

             महाराष्ट्र समावेशित शिक्षण

            व्यावसायिक संघ #MAIEP

#HappyTeachersDay 

#ThankATeacher2021 

#thankyouteachers 

#MyTeacherMyHero 

#myfavoriteteacher 

#inclusiveeducation 

Post a Comment (0)
Previous Post Next Post

Recent Posts

Facebook