शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई / प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई
समग्र शिक्षा अभियान
समावेशित शिक्षण
यशोगाथा
{tocify} $title={Table of Contents}
शिक्षणातील अडथळे दूर करित अब्दुल ने मिळविले दहावीच्या परीक्षेत यश | success story of intellectual disability in inclusive education
विद्यार्थी माहिती
विद्यार्थांचे नाव - अब्दुल रहीम रझाक शेख
प्रवर्ग - बौद्धिक अक्षम
आईचे नाव - समिना रझाक शेख
जन्मतारीख - २८/०६/२००३
शाळेचे नाव - न्यू हबीब हाय स्कूल (सँडहर्स्ट रोड)
माध्यम- इंग्रजी
इयत्ता - १० वि
आकर्षक मथळा
अब्दुल हा १० वी बोर्ड च्या परीक्षेत पास झाला पाहिजे
कौटुंबिक माहिती
अब्दुल च्या घरामध्ये एकूण ३व्यक्ती आहेत . आई ,बाबा आणि अब्दुल त्याच्या आई बाबा मध्ये जास्त वयाचा फरक आहे अब्दुल त्याच्या वयानुसार उशिरा जन्मला आहे . त्याच्या घरातील कोणालाही असा प्रॉब्लेम नाही .
वैद्यकीय माहिती
अब्दुल चा गावी घरी जन्म झाला आहे. विकासाचा टप्पा उशिरा झालेला आहे . आईचे वय ३२आणि बाबांचे वय ४५आहे. आईचे अब्दुल च्या जन्माच्या वेळेस सीझर झाले होते. दीड वर्षाचा असताना त्याला फिट्स आली होती.
यशोगाथा निवडण्यामागचा हेतू
अब्दुल हा बौद्धिक अक्षम विदयार्थी आहे. ८ वी पर्यंत अब्दुलचा प्रोग्रेस जेमतेम होता. शिक्षकांचा वारंवार तक्रारी पालकांकडे येत होत्या त्या वेळेस अब्दुलच्या वर्ग शिक्षिकेने (मुश्रत) त्यांला ट्रीटमेंट चा सल्ला दिला त्या नंतर पालकांनी नायर हॉस्पिटलला ट्रीटमेंटची सुरवात केली.
ट्रीटमेंट करताना त्याला बुध्यांक चाचणीचे सर्टिफिकेट देण्यात आले. त्याचा IQ ६५% देण्यात आला. ८ वी तो जेमतेम पास झाला. इयत्ता ९ वी मध्ये दोनदा fail झाला होता त्यानंतर त्याने फेरपरीक्षा देऊन पास झाला आणि बोर्ड ची १० वी ची परीक्षा पास होण्याचा हेतू होता.
शाळेचा इतिहास
अब्दुल चे प्रायमरी शिक्षण प्रायव्हेट स्कूल मध्ये झालेले आहे . त्यानंतर त्याच्या पालकांनी सॅण्डहर्स्टरोड़ डोंगरी येथील न्यू हबीब हायस्कूल येथे इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतला. ती इंग्रजी माध्यमाची अनुदानित शाळाआहे. जास्त गर्दीच्या ठिकाणी शाळा आहे.
वर्तमान सर (विविध कौशल्य निहाय)
इयत्ता ९ वी मध्ये त्याला त्या वर्गाचे विषय कठीण जाऊ लागले ते वर्ष तो नापास झाला. शाळेचा मीटिंगला पालकांना बोलवण्यात आले व त्याचा प्रोग्रेस बाबत चर्चा झाली व पालकांचा सहमतीने पुन्हा ९ वी चा वर्गात बसवले अब्दुल हा १० वी मध्ये ५६%ने पास झालेला आहे आणि त्याला आता पुढे कॉलेज न करता त्याच्या आवडीनुसार आणि कोर्स करायचा आहे.
आव्हाने (शाळा शिक्षक पालक
जेव्हा अब्दुल ची फेरपरीक्षा घ्यायची होती. तेव्हा शाळेमध्ये जाऊन प्रथम मुख्यध्यापक, शिक्षक यांना मार्गदर्शन केले विषयनिहाय शिक्षकांना मांडणी दिल. काहींचा प्रतिसाद चांगला होता परंतु काहींना वारंवार सूचना द्याव्या लागल्या.
या सर्वांच्या सहकार्यांने अब्दुल ९ वी पास झाला त्यानंतर १० वी मध्ये गेल्यावर वर्षभर पाठपुरावा केला व बोर्ड च्या परीक्षेला लेखिनक देताना थोडी समस्या आली परंतु त्यावर मात करुन अब्दुल पास झाला .
कृती आराखडा (कौशल्य अनुसरून)
अब्दुलच्या आईला माझा नंबर दुसऱ्या पालकांकडून मिळाला त्यांनी मला फोन केला त्या नंतर न्यू हबीब शाळेमध्ये मी भेट दिली. मुख्याध्यापक सोबत दिव्यांग मुलांबाबत चर्चा झाली.
प्रत्येक वर्गात भेट दिली असता वेगवेगळ्या प्रवर्गाचे चार मुले भेटली त्या मध्ये अब्दूलही होता शाळेचा दुसऱ्या भेटीत अब्दुलच्या पालकांना त्याची मेडिकल फाईल घेऊन बोलवण्यात आले मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांचा सह बैठक घेतली तेव्हा इयत्ता ९ वी ची फेर परीक्षा बाकी होती.
१६ ऑक्टोबर २०१८ चा GR नुसार सेवा सुविधा देण्यास सांगितले. त्यामध्ये (१) पहिली भाषा इंग्रजी अनिवार्य (२) हिंदी / टाकाऊ पासून टिकाऊ (३) मराठी / पुस्तक बांधणी (४) गणित / ७ वी चे गणित + दूध आणि दुधाचे पदार्थ (५) विज्ञान / आरोग्यशास्त्र, शरीरशास्त्र व गृहशास्त्र (६) सामाजिक शास्त्र अनिवार्य राहील याचे मार्गदर्शन केले.
वरील विषयांपैकी इंग्रजी, ७ वी चे गणित, सामाजिक शास्त्र हे विषय विषय निहाय शिक्षकांना तयारी करून घेण्यास सांगितले. वरील कार्यानुभवचे विषय पालक मुख्याध्यापक, शिक्षक व माझा मदतीने तयारी करून घेण्यात आली. तेव्हा अब्दुल ९ वी मध्ये पास झाला अब्दुल चा जो उद्देश होता तो १० वी पास होण्याचा तो सर्वांच्या सहकार्याने पूर्ण झाला शाळा स्तरावर सर्वांचा सपोर्ट मिळाला आणि त्यासोबत त्याचे नातेवाईक व मित्रांची पण मदत मिळाली .
कृतीची मालिका व अंमलबाजवणी
ज्यावेळेस बोर्ड चा फॉर्म भरला त्या वेळेस शाळेत भेट दिली असता मुख्याध्यापक सोबत अब्दुलचा परीक्षेला लेखनिक बाबत चर्चा झाली अब्दूलला दोन लेखनिक देणे आवश्यक होते ७ वी गणितासाठी ६ वि इयत्ताचा लेखनिक व इतर विषयांसाठी ९ वि इयत्ताचा लेखनिक उपलब्ध करून द्यायचा होता.
अब्दुल चा जो उद्देश होता तो १० वी पास होण्याचा तो सर्वांच्या सहकार्याने पूर्ण झाला शाळा स्तरावर सर्वांचा सपोर्ट मिळाला.
यशामध्ये पालक/सवंगडी सहभा
अब्दुल च्या यशामध्ये पालकांना शाळा समावेशित व्यवसायिक ,मित्र ,नातेवाईक यांच्या सहकार्याने त्याला यश मिळाले .
इतर सुविधा -
SSA अंतर्त सर्व सुविधा त्याला देण्यात आल्या . व थेरपि बाबत तही मार्गदर्शन केले .
शिक्षण/पालक यांचे समुपदेशन
अब्दूलला वर्गात शिकवताना ज्या अडचणी येत होत्या त्यामध्ये अध्ययन शैलीनुसार वेळोवेळी मार्गदर्शन केले पालकांना निवडलेल्या विषयाचे पाठयपुस्तक व साहित्य उपलब्ध करून दिले आणि त्या विषयाचे मूल्यमापन कसे करायचे त्यावर शिक्षकांना मार्गदर्शन केले .
यशस्वी/साध्य झालेल्या बाबी-
मुख्याध्यापकांनी २ मुलाना बोलावून घेतले व त्यांना लेखनिक बाबत समजावून सांगितले. परीक्षेचा आधी प्रात्यक्षिक तयार करून जमा करायला सांगितले.
१० वी चा परीक्षेचे सेंटर दाऊदभाई फझलभाई हायस्कूल मिळाले. पहिला पेपरला अब्दुल परीक्षा सेंटर वर पोहचला पण अब्दुलचा लेखनिक शाळेत पोहचलाच नव्हता मला पालकांचा कॉल आला व मी त्याच्या मुख्याध्यापकांशी चर्चा केली त्या नंतर तिथे लेखनिक पोहचला.
तेव्हा अर्धा तासानंतर पेपर लिहायला सुरवात केली पूर्ण परीक्षा पार पडली व शेवटचा पेपरला कोरोनाचे संकट आले व शेवटी सर्वांचा सहकार्याने (मुख्याध्यापक - यास्मिन खान, शिक्षक – रेहाना, प्रादेशिक विद्या प्राधिकरण समावेशित विषयतज्ञ् आशा शिंदे) अब्दुल आज ५७% मिळून पास झाला.
अब्दुल ला १६ ऑक्टोबर २०१६ च्या शासननिर्णयानुसार इयत्ता ९ वि मध्ये ऐच्छिक विषयाची निवड त्याविषयी मार्गदर्शन केले आणि तेच विषय इयत्ता १० वी मध्ये देऊन आणि लेखनिक दिला त्यामुळे तो ९ वि आणि १० वी चांगल्या मार्काने पास झाला.
पुढील काळात करावयची कामे-
१० वी पास नंतर त्याला कॉलेज ला जायचे नसल्यामुळे त्याला त्याच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार कोर्सेस ची माहिती दिली.
शब्दांकन/संकलन
मा. श्रीम.आशा शिंदे , विशेषतज्ञ व, शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई / प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई