दिव्यांगत्वावर मात करित अजय व अमोल ने मिळविले यश | Success story of Ajay and Amol

cwsn success story

{tocify} $title={Table of Contents}

दिव्यांगत्वावर मात करित अजय व अमोल ने मिळविले यश | Success story of Ajay and Amol

माणूस हा समाजातून शिकत असतो.शिक्षणामुळे मनुष्य प्रगती करू शकतो. प्रत्येकाला मुलभुत हक्क ‍दिलेले आहे. त्यापैकी शिक्षण हे एक आहे. दिव्यांग विदयार्थीना ही कायद्याने शिक्षण देणे गरजेचे आहे . शिक्षण हक्क कायद्यान्वये  ‍दिव्यांगाना देखील शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला आहे. 

प्रत्येकाच्या जीवनात सुख- दु:ख येत असतात. यावर मात करून जीवनात कस उभं रहावं लागतं. यासाठी अंबड तालुक्यातील ‍ गोविदपूर तांडा येथील सुभाष गंगाधरराव पवार यांना दोन मुले झाले. दोघाना जन्मत: कर्णबधरित्व आले आहे.पण आई -वडील निराश न होता सामान्य मुलाप्रमाणे आपले मुल  शिकल ‍पाहिजे, अशी आशा बाळगली.व त्यांनी दिव्यांगत्वार मात केली.

गृहभेट 

सन २०११ मध्ये प्रथम नियुक्तीनंतर कामाची रूपरेषा समजून घेतली. सुभाष गंगाधरराव पवार यांची प्रथम गृहभेट घेतली. या भेटीत प्रथम पालकांना ‍दिव्यांगत्वाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पालकांनी सगितले की, माझे मुल सामान्य मुलाप्रमाणे शिकतील का, मुलं ही माझ्याप्रमाणे शेतीच करतील. पालकांना सगितले की, 

प्रत्येक कर्णबधीर  मुलांना थोडी फार उर्वरीत ऐकण्याची क्षमता असते. याच क्षमतेला विकसित केले पाहिजे. विदयार्थीना श्रवणयंत्राच्या मदतीने स्पीच थेरपी देउन शब्दाचे उच्चारण करून घेता येते, जास्तीत जास्त ऐकण्यावर भर देणे. जगातील व भारतातील दिव्यांग क्षेत्रात कार्य केलेल्या हेलन केलर ,लुई ब्रेलस, अल्बर्ट आयसटाईन, सुधाचंद्रन, रविद्र जैन,अरूणीमा सिन्हा, शेखर नाईक, दिव्यांग व्यक्तीचे कार्य सांगितले. त्यांनी दिव्यांगत्वार मात करून नवीन प्रेरणा जगासमोर ठेवली. प्रत्येक मुलं शिकू शकतं.  मुलांनी स्वत:च्या पायावर उभे राहवे .पालकांनी आपल्या मुलांना बोलत करण्यासाठी प्रत्यन करावे अशी इच्छा व्यक्त केली.

शाळाप्रवेश ‍

जिल्हा परिषद प्राथ‍मिक शाळा गोविदपूर  येथे विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे , म्हणून  पालक , मुख्याध्यापक यांच्याशी चर्चा केली. मुख्याध्यापक यांनी संगितले की, सर आम्हाला खुणाची भाषा येत नाही, या मुलांना खुणाची भाषा कशी शिकवयाची, तसेच मुले आम्ही बोललेले ऐकतील का  ?  घरची भाषा बंजारी ,व्यवहारातील भाषा मराठी, मुलांना खुणाची भाषा शिकवण्याची असे प्रश्न होते.  

शिक्षक, मुख्याध्यापक  व पालकांना  संगितले की, कर्णबीधर विद्यार्थ्यांना दृश्यअध्ययन शैली , हावभाव लीप, रीडिग या पध्दती ‍शिकविल्यास मुलांना लवकर समजेल. त्यामुळे शिक्षकांनी प्रवेश  दिल्यामुळे  मुले   शाळेत रमली. ३-४ भेटीत अजय व अमोल यांच्याशी  मित्रात्वाचे नाते केले. तसेच सवंगडी यांना ही त्यांची ओळख करून दिल्यामुळे त्यांच्याही कुतूहूल  निर्माण झाले. घरच्या भाषेमुळे भाषा विकासावर ‍ परिणाम होत होता .त्यामुळे पालकांना  जास्तीत जास्त घरी संप्रषेणसाठी  मराठीत बोलण्याचा सराव घ्यावा असे सांगितले. 

प्रत्येक मुल शिकू शकतं.‍

समावेशित  शिक्षणामुळे  दिव्यांग विदयार्थीना  सामान्य शाळेत ,सामान्य मुलासोबत  व घराजवळच्या शाळेत प्रवेश मिळू लागला , सर्व शिक्षा अभियान  अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांचा शोध घेवून त्यांना  ‍त्यांच्या गरजेनुसार शैक्षणीक, वैद्यकीय सोयी सुविधा देणे. 

अजय व अमोल यांना आरोग्य शिबिरात श्रवणदोष तज्ञांच्या मार्फत श्रवणआलेख  काढून त्यांना पॉकेट मॉडेल, श्रवणयंत्र , बी.टी.ई श्रवणयंत्र दिल्यामुळे ऐकण्याची संधी मिळाली .तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र ही मिळाले. सातत्याने श्रवणयंत्राचा वापर केल्यामुळे स्पीच थेरपी घेतल्यास ऐकण्यात फरक पडत असल्याचा दिसुन आला. 

आवाजाकडे लक्ष देणे, शब्द  उच्चारण प्रयत्न करणे ,श्रवणयंत्रामुळे परिसरातील आवाज ,शाळेतील गाणी इ. कानावर पडू लागले .त्यामुळेअजय व अमोल यांना शाळेत येणा-याची आवड निर्माण झाली.

वर्गातील वर्गमित्र  यांचा मदतीने अजय व अमोल यांना अभ्यासात मदत घेणे ,हाताच्या खुणा न करणे ,बोलताना लीप रीडिगचा वापर करणे, हळू हळू आवाजात बोलणे इ सवंगडीच्या मदतीने करून घेतले . प्राथमिक  शिक्षण  गोविदपूर या  शाळेतून पूर्ण झाले.  

प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षण कसे कुठे करायचे असा पश्न पालकांना पडला , पालकांना मार्गदर्शन व समुपदेशन  करून जि प प्रशाला अंबड येथे  प्रवेश निशीचत केला. 

मुलं  दररोज अंबडला येण जाणच प्रश्न , मुले कशी शिकतील, शिक्षण आपण पूर्ण करू शकलो का ? या समस्या  होत्या .जिल्हा समन्वयक श्री ठाकूर सर व श्री ज्ञानेश्वर इप्प्‍पर  सर, विषयतज्ञ व  विशेष  शिक्षक यांनी  शिक्षकाचे मार्गदर्शन व समुपदेशन केले.

शिकण्याची आवड 

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या प्रमाणे प्रत्येकामध्ये काही कला गुण लपलेले असतात. या गुणांना वाव मिळाला  की आत्मविश्वास  निर्माण होतो .अजय व अमोल यांना ही संधी दिल्यामुळे  शिकण्याची आवड निर्माण झाली. 

मुलांना बोलत करण्यासाठी स्पीच थेरपीचा फायदा झाला .स्पीच थेरपीमुळे शब्दाचा उच्चार करणे, लीप  रीडिग  करणे,  गणीतीय  क्रिया विविध साहित्याच्या माध्यामातून  करणे शाळेत शिकविण्यासाठी  विविध तंत्रे  अध्ययन पध्दती तसेच बहूअध्ययन शैलीचा  वापर करण्याबाबत   शिक्षकांनी ही प्रत्यन केले.

वर्गात लुप इंडक्शन सटिमच्या माध्यामातून  शिक्षक विद्यार्थ्यांना  शिकवत होते. पालक व  शिक्षक प्रशिक्षणातून या  मुलांना  कोणात्या अध्ययन पध्दतीचा उपयोग केल्यास मुलांना समजेल याबाबत मार्गदर्शन व समुपदेशन केले.

अजय व अमोल यांना चित्रकलेची आवड होती .या कलागुणंना वाव मिळावा यासाठी  वर्ग  शिक्षकांनी चित्रकलेच्या परीक्षेत बसविले यात ही त्यांनी यश मिळविले . चित्रकलेचा फायदा शालांत परीक्षेत ग्रेसचे मार्क मिळवण्यासाठी झाला .अजय 51%व अमोल ला 53% गुण मिळविले पालकांनी व मुख्याध्यापकांनी   शिक्षक यांनी एक संधी दिल्यामुळे यश मिळाले.

भविष्याची वाटचाल 

अजय व अमोल उच्च शिक्षण घेवून  स्वत:च्या पायावर उभे रहावे. या दृष्टीकोनातून करियर विषयक  पालकांना  व  विद्यार्थ्यांना आय टी आय मधील व्यावसायिक  कौशल्य MECHANIC MOTORS VEHICLE कोर्स करून ‍   
आत्मनिर्भर होईल  म्हणून पालकांना व विदयार्थीना मार्गदर्शन केले. 


तसेच आय टी आय मधील प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाने ‍ विदयर्थ्यीना MECHANIC MOTORS VEHICLE कोर्स  ‍हा दिला  .यात ही प्रॅकटिकल मध्ये  विद्यार्थ्यांना यश  मिळविले व परीक्षेत अजय 79% व अमोल 74% गुण  मिळवून यश  संपादन केले . पुढील वाटचालीसाठी अजय व अमोल सुभाष पवार यांना  हार्दिक शुभेच्छा. 

सारांश

अजय व अमोल च्या यशामध्ये  संपूर्ण वाटचालीत आदरणीय प्राचार्य श्री.राजेद्र कांबळे साहेब (जिल्हा प्रशीक्षण संस्था जालना), आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री.अजयजी काकडे साहेब (राज्य समन्वयक म.प्र.शि.प.मुंबई ), शिक्षणाधकारी श्री कैलास दातखीळ साहेब (जि प जालना)‍,  समावेशित विभाग प्रमुख  श्री.सतिषजी सातव साहेब आधिव्याख्याता (जिल्हा प्रशीक्षण संस्था जालना),  श्री विपूल भागवत साहेब (गटशिक्षणाधकारी  पं.स.अंबड), जेष्ठ आधिव्याख्याता,  श्री राजेश ठाकूर सर (जिल्हा समन्वयक),  श्री ज्ञानेश्वर इप्प्पर साहेब (‍जिल्हा समन्वयक ) , विस्तारआधिकारी ,केद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, विषयतज्ञ व विशेष ‍ शिक्षक व सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

संकलन - रोहन कुलकर्णी विशेष शिक्षक, गटसाधन केंद्र अंबड

Post a Comment (0)
Previous Post Next Post

Recent Posts

Facebook