समावेशित शिक्षण व्यावसायिकांना राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत सहभागी होण्याची संधी | scert Innovation Competition
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र , पुणे SCERT Pune मार्फत शिक्षण क्षेत्रातील सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये समावेशित शिक्षण अंतर्गत कार्यरत केंद्रस्तरीय , तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय व्यावसायिकांना देखील या नवोपक्रम स्पर्धेत सहभागी होण्याची संधी आहे.
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत समावेशित शिक्षण व्यावसायिकांना मिळालेले यश
गतवर्षी सन २०२०-२१ मध्ये तालुकास्तरीय व्यावसायिक संतोष प्रकाश पाटील यांनी "एक पाऊल दिव्यांग बालकांच्या समतेकडे" या विषयावर , विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती गटामधून प्रथम क्रमांक मिळाला होता. त्याचबरोबर वसुधा जाधवराव , सातारा यांनी "दृश्य अध्ययन शैली व बहु अध्ययन शैली विद्यार्थ्यांची शालांत भरारी" विषयावर राज्यस्तरीय सादरीकरण प्रमाणपत्र मिळविले होते. फयाज अहमद पाशा मियाँ चिंचोलीवाले यांनी देखील “शिक्षण माझ्या शैलीचे” या विषयावर राज्यस्तरीय सादरीकरण प्रमाणपत्र मिळविले आहे.
> समावेशित शिक्षण: दिव्यांग प्रेरणादायी पुस्तके | divyang motivation book
> नवोपक्रम "एक पाऊल दिव्यांग बालकांच्या समतेकडे" आणि "दृश्य अध्ययन शैली व बहु अध्ययन शैली विद्यार्थ्यांची शालांत भरारी" वेबिणार पाहण्यासाठी अवश्य भेट द्या.
{getButton} $text={MAIEP YouTube Channel} $icon={MAIEP YouTube Channel}
समावेशित शिक्षण व्यावसायिकांना नवोपक्रम स्पर्धेत सहभागी होण्याची संधी
कोरोना काळात तर ऑनलाईन/ऑफलाईन शिक्षण मुलांपर्यंत कशा पद्धतीने पोहचवता येऊ शकते? याचे नवनविन उपक्रम शिक्षकांनी हाती घेतलेले आहे. समावेशित शिक्षण व्यावसायिक देखील विशेष गरजा असणाऱ्या (cwsn) मुलांसाठी नवोपक्रम राबवित आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक केंद्रस्तरीय , तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय व्यावसायिकांना राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत सहभागी होण्याची संधी आहे.
> झूम ऑनलाईन मिटिंग मध्ये मोबाईल मधून PPT PDF Exal Sheet शेयर कशी करायची?
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२०-२१ साठी नवोपक्रम सादर करण्याकरिता ऑक्टोबर २०२१ मध्ये स्वतंत्रपणे लिंक व माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे. यानुषांगाने अजून तीन महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे. त्यामुळे या तीन महिन्यात आपण समावेशित शिक्षण संबंधी नवोपक्रम राबवून स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. यासाठी आपण आपल्या जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) कार्यालयातील संशोधन विभाग अधिव्याख्याता यांच्याकडून अधिक माहिती घेता येऊ शकेल.
सर्व नवोपक्रमशील शिक्षक तसेच अधिकारी , समावेशित शिक्षण व्यावसायिक आपणास खूप खूप शुभेछ्या !
समावेशित शिक्षण नवोपक्रम लेखन वेबिणार
महाराष्ट्र समावेशीत शिक्षण व्यावसायिक संघ Maharashtra Association of Inclusive Education Professional (#MAIEP) द्वारा आयोजित 87 व्या You tube Live संवादामध्ये समावेशित शिक्षण आणि नवोपक्रम लेखन या विषयाला अनुसरुन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथील वरिष्ट अधिव्याख्याता, मा. डॉ. गीतांजली बोरुडे यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन केले आहे.
> राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२१-२२
समावेशित शिक्षण नवोपक्रम लेखन वेबिणार