कोव्हीड १९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अद्यापही शाळा सुरु झालेल्या नाहीत. शासनामार्फत मुलांचे शिक्षण सुरु राहावे यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये नुकताच सेतू अभ्यासक्रमाला १ जुलै पासून सुरुवात झाली आहे. त्यासोबतच SCERT SWADHYAY 2021 , SCERT अभ्यासमाला , ज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रम , शिकू आनंदे कार्यक्रम तसेच Youtube वाहिनी च्या माध्यामतून Online क्लास सुरु आहे.
सर्व घटकातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहावे हे आव्हानात्मक काम असून यामध्ये पंचायत समिती मुळशी समावेशित शिक्षण अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी ऑनलाइन क्लासेस चे आयोजन करण्यात येते.
समावेशित शिक्षण अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांचा ऑनलाईन क्लासेसला उत्स्फूर्त प्रतिसाद
दिनांक 16/7/2021 वार शुक्रवार रोजी संपन्न झालेल्या ऑनलाईन वर्ग
> विषय - मराठी
> घटक - माझे मित्र
वर्गाची सुरुवात दिनांक वार विचारून , देवीच्या प्रार्थनेने केली.
🌝 या विषयावर विद्यार्थ्यांना स्वतःचे नाव सांगणे व मित्रांचे नाव सांगणे ही क्रिया करून घेतली मुलं आनंदाने स्वतःचे नाव सांगत होते.
🐤 त्यानंतर सेतु अभ्यासक्रमातील व्हिडिओ क्लिप द्वारे माझे मित्र हा व्हिडिओ दाखवून विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.
🐴 तसेच माझे मित्र हे उडणारे प्राणी शेपूट असणारे प्राणी पाण्यात असणारे प्राणी जमिनीवर सरपटणारे प्राणी जमिनीवर चालणारे प्राणी आकाशात उडणारे प्राणी हे सगळे प्राणी आहेत याबाबत माहिती सांगितली विद्यार्थी माहिती ऐकून घेतात.
🐒 त्यानंतर विद्यार्थ्यांना वरील सर्व प्रकारच्या प्राण्यांचे चित्र दाखवून विचारण्यात आले हा प्राणी कुठे असतो उदाहरणार्थ आकाशात उडणारे प्राणी शेपूट असणारे प्राणी पाण्यात असणारे प्राणी विद्यार्थी चित्र बघून उत्तम प्रतिसाद देतात.
🐱 त्यानंतर विद्यार्थ्यांना प्राण्यांचे आवाज प्राण्यांची चाल किंवा कृती करून दाखवली.
🦁 विद्यार्थ्यांकडून कृती करून घेतली उदाहरण अर्थ माकड उड्या बॅड खोड्या हरीण हरिण चाल हत्ती चाल घोडा चाल बेडूक उड्या पक्षी चे पंख मोराचा नाच तसेच विविध आवाज मांजरी चा आवाज कुत्रा शेळी कावळा चिमणी यांचे आवाज काढून घेतले.
🌹 हत्ती ची कृती करताना विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला तसेच बेडूक उड्या माकड उड्या करताना आनंदाने उड्या मारत होते तसेच पक्ष्यांचे प्राण्याचे आवाज काढताना मनसोक्त आवाज काढत होते प्रतिसाद बघून आम्हा सर्वांना आनंद झाला.
🕺🕺 पालकांनीसुद्धा या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभाग नोंदवला.
🎪 गृहपाठ
तुमच्या आवडत्या मित्राची माहीती लिहून पाठवा किवा फोटो काढुन पाठवा.
🎤 सदर मिटींगला दिव्यांग ग्रुप मधील 15 मुले उपस्थित होते. पालक , विशेष साधन व्यक्ती, व विशेष शिक्षक उपस्थित होते.
सादरकर्ते/शब्दांकन
श्रीम. योगिता काळे , विशेषतज्ञ पंचायत समिती मुळशी