नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका अंतर्गत पोखरी केंद्रस्तरीय रिसोर्स टीचर (RT) श्री सचिन राजेंद्र जाधव यांनी राबवलेला अंधारातून प्रकाशाकडे हा
नवोपक्रम...
{tocify} $title={Table of Contents}
अंधारातून प्रकाशाकडे
प्रस्तावना
समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण अंतर्गत क्षेत्रीय भेटी दरम्यान मन्याडचौकी गावात सात वर्षाचा शाळा प्रवेश पात्र विद्यार्थी आढळला प्रथम दर्शनीच त्याला दोन्ही डोळ्याने दिसत नाही असे समजले तेव्हा त्याला सर्वप्रथम शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेत दाखल केले.
त्यानंतर तालुका RBHK आरोग्य तपासणी डॉक्टरांशी संपर्क साधून हर्षलबद्दल माहिती दिली त्याची प्राथमिक तपासणी त्यांनी केल्यावर पुढील तपासणी व उपचारासाठी जिल्हा समन्वयक यांनी तुलसी आय हॉस्पिटलशी संपर्क साधून हर्षलच्या डोळ्यांची तपासणी करणे कामी तारीख घेऊन आम्हास कळवले.
> समावेशित शिक्षण: दिव्यांग प्रेरणादायी पुस्तके | divyang motivation book
त्यानुसार त्याची वैद्यकीय तपासणी प्रकिया पार पाडली तेव्हा हर्षलची दृष्टी पुन्हा येऊ शकत नाही असे कळाले असता हर्षलचे पूर्ण भविष्य असेच अंधकारमय जाईल तो शाळा शिकू शकणार नाही. त्यामुळे त्याचे पालक नाराज झाले परंतु हर्षल सामान्य शाळेत समवयस्क मुलांसोबत उत्तम शिक्षण घेऊ शकतो. असा आत्मविश्वास रिसोर्स टीचर यांनी दिल्यावर पालकांच्या चेहऱ्यावर एक आशेचा किरण निर्माण झाला.
त्यांचा विश्वास ह्या नवोपक्रमातून काही अंशी कसा सार्थ केला ते ह्या उपक्रमातून मांडण्याचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न मी केलेला आहे.
> राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२१-२२
> SCERT SWADHYAY 2021
> दिव्यांगांच्या शिक्षणासाठी सेतू अभ्यासक्रमाचे अनुकूलन | Adaptation of Setu syllabus for cwsn
उपक्रमाची गरज व महत्व
उपक्रम निवडण्याची गरज
हर्षल हा १०० % अंध ७ वर्षाचा
दिव्यांग मुलगा असून त्यास दिलेल्या सूचना कशा समजतील ? त्यास कसे शिकवावे ? हा प्रश्न त्याच्या अशिक्षित पालकांना तसेच वर्गशिक्षिकेला पडला होता त्यामुळे पालक व वर्गशिक्षिका यांना मार्गदर्शन व हर्षलला आवश्यकतेनुसार अध्यापन यासाठी ह्या उपक्रमाची गरज निर्माण झाली.
उपक्रमाचे वेगळेपण, उपयुक्तता
विशेष गरजा असणाऱ्या (CWSN) बालकांचा विकास शारीरिक मानसिक व बौद्धिक दृष्ट्या हा सर्व सामान्य किवा समवयस्क बालकांपेक्षा कमी , खुंटलेला किवा संथ गतीने चालू असतो त्यामुळे त्यांना
समावेशित शिक्षण अंतर्गत राबिवण्यात येणाऱ्या उपक्रमाद्वारे रिसोर्स टीचर मार्फत
विशेष गरजा असणाऱ्या (CWSN) बालक, पालक व शिक्षक यांना बालकाचा सर्वांगीण विकास तसेच त्यास वैद्यकीय व शैक्षणिक सहाय्यभूत सेवा समुपदेशन आवश्कतेनुसार थेरपी होम बेस विद्यार्थी यांस गृह मार्गदर्शनासाठी ह्या उपक्रमाचे वेगळेपण, उपयुक्तता दिसून येते.
उपक्रमाची उद्दिष्टे
हर्षललाही सामान्य व समवयस्क मुलांसोबत शिक्षण , पोषण आहाराचा तसेच शासकीय योजना व सवलतींचा लाभ मिळावा.
- हर्षलच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी.
- हर्षल अंध असल्या कारणाने कौटुंबिक सामाजिक व शैक्षणिक गैरसमजदूर करून त्यावर उपाययोजना करणे.
- हर्षलचे १०० % अंधत्व त्याची तीव्रता लक्षात घेऊन व त्याच्या इतर क्षमतेचा विकास करण्यास प्रोत्साहित करणे.
- हर्षलच्या वर्गशिक्षिका यांना विविध अध्ययन शैलीचे महत्व समजावणे.
- शाळापूर्व कौशल्य विकसन संकल्पना माहिती व स्वरूप स्पष्ट करून सांगणे.
- दैनंदिन जीवनातील कौशल्य व ADL SKILLS बाबतीतील प्रात्यक्षिकिकरण व महत्व समजावणे .
- कारक कौशल्याची गरज व महत्व प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्ट करणे.
>
सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्सची) घोषणा | Bridge Course announcementनवोपक्रमाचे नियोजन
I) उपक्रम पूर्व स्थितीचे निरीक्षण
शाळाबाह्य विद्यार्थी सर्वे करतांना मन्याडचौकी वस्तीवर सहा ते सात वर्षाच्या एका मुलगा आढळून आला त्यानंतर प्रथम दर्शनीच त्याला अजिबात दिसत नाही असे प्राथमिक चेक लिस्ट चा वापर करून रिसोर्स टीचर यांना समजले तो १०० % अंध असल्याचे लक्षात आले तदनंतर लगेचच त्यास शिक्षणाचा अधिकार २००९ अधिनियम अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मन्याडचौकी शाळेत दाखल करण्यात आले.
II) संबंधित व्यक्तीशी /तज्ञांशी चर्चा
हर्षलला दोन्ही डोळ्यांनी अजिबात दिसत नसल्याकारणाने त्यावर काय वैद्यकीय उपचार करता येतील यासाठी तुलसी आय हॉस्पिटल नाशिक येथे पालक वर्गशिक्षिका व रिसोर्स टिचर आम्ही घेऊन गेलो तिथे हर्षलची तपासणी झाली परंतु त्याच्या डोळ्यांची दृष्टी येणे शक्य नाही
दिव्यांग प्रमाणपत्र शासकीय रुग्णालयातून काढून घ्या त्याला ऐकु चांगले येते त्यामुळे त्याला शिक्षण घेण्यास अडचण नाही असे असे तज्ञ डॉक्टरांनी सांगितले त्यांनी मार्गदर्शन केले.
III) आवश्यक साधनांचा विचार:-
हर्षल हा अंध असल्याकारणाने त्याला
श्रवण, स्पर्श व मिश्र ह्या
अध्ययन शैलीनुसार शिकवावे लागेल याचा विचार करून शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली
जसे –
१. मऊ, टणक व खरबडीत घटक शिकवतांना त्यानुसार हाताने बोटाने स्पर्श देऊन संकल्पना दृढ केली
२. थंड गरम शिकवतांना अंघोळ करतांना थंड व गरम (कोमट) पाण्याचा प्रत्यक्ष अनुभव देणे स्पर्श त्याचा वापर कसा करावा त्याबद्दल पालकांना यांस मार्गदर्शन केले .
IV) करावयाच्या कृतीचा क्रम
१.शाळेत येण्याआधी हर्षल अनोळखी व्यक्ती बोलली किवा काही विचारले तर तो रडून देत असे त्यामुळे सर्वप्रथम वर्गशिक्षिका रिसोर्स टीचर यांना त्याच्यासोबत प्रथम ओळख करावी लागली त्यासाठी वारंवार गृहभेटी द्वारे त्याच्या सोबत गप्पा केल्या.
२.हर्षलला दैनंदिन क्रिया (
ADL SKILL) कार्य करण्यास अडचणी निर्माण होत असे जसे दात घासणे, आंघोळ करणे, केस विंचरणे, कपडे घालणे,शर्टची बटन लावणे,चप्पल घालणे, जेवण करणे तसेच शी व सु साठी सांगणे ह्या क्रमाने वैयक्तिक व शैक्षणिक प्रत्येक कौशल्याचे सूक्ष्म नियोजन केले.
V) उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण
हर्षल नियमित शाळेत यायला लागल्यानंतर त्याचे वैयक्तिक,सामाजिक व शैक्षणिक कौशल्याचे निरीक्षण करून त्यानुसार त्याचे पूर्व मुल्यांकन ( Pre Assessment ) केले.
VI) कार्यवाहीचे टप्पे (वेळापत्रक )
पूर्व मुल्यांकन ( Pre Assessment ) झाल्यानंतर त्यानुसार वर्गशिक्षिका व रिसोर्स टिचर यांनी पुढील कौशल्याची निवड करून त्यानुसार साप्ताहिक, मासिक व वार्षिक ढोबळ नियोजन करून केले. त्याचे प्रत्यक्ष कार्यवाही करणे सुरु केले..त्यानुसार साप्ताहिक कौशल्यात किती प्रगती केली त्यासाठी दर शनिवारी रिसोर्स टिचर मार्फत
मूल्यमापन केले केले.
VII) उपक्रमासाठी इतरांची मदत
हर्षलला सामान्य शाळेत समवयस्क मुलांसोबत हसत खेळत तसेच शिक्षण सुलभ व्हावे यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका ,गावातील गावकरी पालक वर्ग यांची खूप मदत झाली तसेच शाळेतील मुले वर्गातील सवंगडी मित्र यांनी हर्षला समजून हा
उपक्रम यशस्वी होण्यासाठी अशा सर्वांचीच मल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत झाली. तसेच त्यास जिल्हा स्तरावर वैद्यकीय उपचार तसेच शैक्षणिक विकासासाठी हर्षलला कसे शिकवावे ? याची अधिक माहिती व वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केल्याने मला जिल्हा तज्ञ वरिष्ठ यांची ह्या उपक्रमासाठी मदत व खूप सहकार्य झाले .
VIII) उपक्रमासाठी सादर करावायचे पुरावे
1.Video :-समावेशित शिक्षणातून हि
दिव्यांग मुलेही सामान्य शाळेत अतिशय आनंदी वातावरणात शिक्षण घेऊ शकतात ह्या उद्देशाने सदर short video बघावा त्यासाठी लिंक वर क्लिक करावे.
2.फोटो

उपक्रमाची कार्यपद्धती
I) पूर्वस्थितीची निरीक्षणे व त्याच्या नोंदी
१. हर्षलची पूर्वस्थिती खूपच वाईट होती त्याचे वैयक्तिक कौशल्यात दैनंदिन कामे स्वतः करू शकत नव्हता.
२. सामाजिक विकासात कोणाशी बोलत नसे.
३. शैक्षणिक विकासाचा तर काही प्रश्नच नव्हता ..ह्या सर्व नोंदी लक्षात घेऊन उपक्रमाची उदिष्टे आखली
II) कार्यवाही दरम्यात निरीक्षणे व माहिती संकलन
१.उपक्रमाची प्रत्येक्ष अंमलबजावणी करतांना त्याची दैनंदिन निरीक्षणे वर्गमित्र, वर्गशिक्षिका यांच्याकडून माहिती संकलन केली.
२. साप्ताहिक नियोजन ह्या माहितीच्या आधारे पुढील नियोजन केले.
III) उपक्रम पूर्ण झाल्यावर निरीक्षणे व त्याच्या नोंदी
हर्षल मध्ये अपेक्षित बदल होतो आहे तसेच त्याचे सामान्य शाळेत चांगल्या पद्धतीने समायोजन झालेले आहे त्याच्या सर्व निरीक्षणे व नोंदी रिसोर्स टिचर यांनी दैनंदिन नोंदवहीत केल्या आहेत .
IV) कार्यवाहीत आलेल्या अडचणी
१.हर्षल हा १०० % अंध
दिव्यांग विद्यार्थी होता त्यामुळे साहजिकच सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्याच्या आयुष्यात खूप अडचणी होत्या त्या अडचणी समजून घेऊन त्या जास्तीत जास्त कशा कमी करता येतील एवढाच विचार करून प्रयत्न करत राहिलो .
२. नांदगाव तालुक्यात एकही अंध विद्यार्थी यापूर्वी नसल्या कारणाने सुरवातीला त्यास कसे मार्गदर्शन करावे कसे शिकवावे हि माझ्यासमोरच मोठी अडचण होती त्यासाठी अंध विशेष तज्ञ हिरामण जाधव सर यांनी मला खूप मदत केली.
३. मागील गेल्या चार महिन्यापासून त्याचे आई वडिल उस तोडणीसाठी बाहेरगावी जातांना सोबत घेऊन गेल्यामुळे शिक्षण हमी कार्ड द्वारे तिकडे शिक्षण घेईल यात शंका नाही पण स्थलांतर हि एक मोठी अडचणच आहे असे मला वाटते.
उपक्रमाची यशस्विता / फलनिष्पत्ती (उद्दिष्टांनुसार)
- हर्षललाही सामान्य व समवयस्क मुलांसोबत शिक्षण , पोषण आहाराचा तसेच शासकीय योजना व सवलतींचा लाभ शाळेत दाखल झाल्यानंतर तो घेऊ लागला.
- ह्या उपक्रमातून शाळेत दाखल झाल्यानंतर हर्षलच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली.
- ह्या उपक्रमातून केलेल्या समुपदेशातून कौटुंबिक सामाजिक व शैक्षणिक गैरसमजदूर दूर झाले.
- ह्या उपक्रमातून हर्षलचे १०० % अंधत्व त्याची तीव्रता लक्षात घेऊन व त्याच्या इतर क्षमतेचा विकास करण्यासाठी शालेय विद्यार्थी, मित्र व गावकरी हे नियमित प्रोत्साहित करू लागले.
- ह्या उपक्रमातून हर्षलच्या वर्गशिक्षिका यांना विविध अध्ययन शैलीचे महत्व समजले.
- ह्या उपक्रमातून दैनंदिन जीवनातील कौशल्य व ADL SKILLS बाबतीतील प्रात्यक्षिकिकरण व महत्व समजले .
- ह्या उपक्रमातून कारक कौशल्याची गरज व महत्व प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्ट झाली.
- ह्या उपक्रमातून हर्षलच्या शाळेतील तसेच गावात सकारात्मक वातावरण निर्मिती झाली.
समारोप
ह्या उपक्रमांतर्गत हर्षल मध्ये पूर्वीपेक्षा खूपच योजलेल्या उद्दिष्टानुसार सकारात्मक बदल झालेला दिसून आला त्यामुळे गुणवत्ता वाढीस नक्कीच फायदा होईल . जन्मता:च हर्षलच्या वाट्याला अंधकार आलाय त्यास समावेशित शिक्षण अंतर्गत शिक्षणाच्या माध्यमातून एक अंधकाराकडून प्रकाशवाट दाखवण्याचे काम चालू आहे हर्षलला हि आता शाळेत गोडी वाटू लागली आहे त्याची नवीन गोष्ट शिकण्याची धडपड याकडे बघून म्हणावेसे वाटते कि ...
“सपने देखणे के लिये, आँखोंकी जरुरत नही होती, क्युकी सपने आँखों से नही , हौसलो से देखे जाते है |{alertSuccess}
संदर्भसूची व परिशिष्टे
१. समावेशित शिक्षण मार्गदर्शिका
२. शिक्षक हस्तपुस्तिका
३. शासन निर्णय शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९
ऋणनिर्देश
कोणत्याही नवीन उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करतांना अनेक व्यक्ती व घटकांची मदत घ्यावी लागते. त्यांच्या सहकार्यानेच मला हा नवोपक्रम यशस्वी करता आला. त्याचा मला खूप आनंद झाला आहे.
चांगले नवोपक्रम पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्ना सोबत निस्वार्थ भावनेने मदत करणारे तसेच आपण करत असलेल्या कार्याची दाखल तसेच वेळोवेळी मार्गदर्शन व प्रोत्साहित करणारे अधिकारी तसेच सहकारी खूप यांचा सुद्धा खूप मोठा वाटा असतो.
माझ्या धडपडीस प्रेरणा देणारे व या श्रेष्ठ कार्यात मला दिशा दाखवणारे आदरणीय प्राचार्य DIET नाशिक, शासकीय संस्था तसेच मला प्रोत्साहित व वारंवार मार्गदर्शन करणारे जिल्हा सक्षमीकरण समन्वयक तज्ञ (DIET Nashik) श्रीम.अवचार Madam श्रीम. मंडलिक Madam व जिल्हा समन्वयक (ZP नाशिक ) श्रीम.पाबळकर Madam यांचे ह्या उपक्रमासाठी खूप मदत व सहकार्य झाले, या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे तसेच माझ्या प्रामाणिक प्रयत्नास मोलाची साथ देणाऱ्या नांदगाव शिक्षण विभागाच्या प्रमुख गटशिक्षणाधिकारी चिंचोले साहेब, विस्तार अधिकारी श्रीम.ठोके Madam,केंद्रप्रमुख श्री. संजीव पवार सर शाळेच्या मुख्याध्यापिका वृषाली पाटील Madam , वर्गशिक्षिका मेघा कुंभारकर Madam यांचे सुद्धा मी ऋण व्यक्त करतो. आणि ह्या नवोपक्रमासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या गावातील गावकरी पालक वर्ग , मन्याडचौकी शाळेतील विद्यार्थी हर्षलचे सवंगडी यांचे समवेत राहून नवोपक्रम यशस्वी केला आहे त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानून कृतज्ञता व्यक्त करतो.
सादरकर्ते/शब्दांकन
श्री सचिन राजेंद्र जाधव , रिसोर्स टीचर (RT) CRC जि.प. प्राथ.केंद्रशाळा पोखरी , तालुका नांदगाव जिल्हा नाशिक