कॉकलियर इम्प्लांट ठरले वरदान | Cochlear implant sucees story
प्रस्तावना
भारतीय राज्यघटनेने प्रत्येकास सहा मुलभुत अधिकार दिलेले आहे. प्रत्येकास शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. तो अधिकार प्रत्येकास मिळाला पाहिजे, यासाठी शासन कटिबध्द असून प्रत्येकास म्हणजे दिव्यांग बालकास सुध्दा शिक्षण घेण्याचा अधिकार असून तो त्याचा अधिकार त्यास मिळण्यासाठी शासनाने अनेक उपयायोजना केलेल्या आहेत. पुर्वी दिव्यांग बालकास वेगवेगळया प्रवर्गनुसार शाळा होत्या.
त्यामुळे त्यांना विशेष शाळेत प्रवेश मिळत असे, वेगवेगळे कायदे करून त्या दिव्यांग बालकास शिक्षण घेण्याचा अधिकार मिळाला. RTE Act 2009 नुसार कायदयानुसार प्रत्येक मुलास आपल्या सोयीनुसार शाळेत प्रवेश मिळू लागला व त्यास शिक्षण घेण्यास संधी मिळू लागली. या कायदायानुसारच दिव्यांग बालकानां पण शाळेत प्रवेश मिळू लागला.
पूर्वी दिव्यांग बालकासाठी विशेष शाळेत सुविधा होत्या. त्यामुळे त्यांना सामान्य शाळेत प्रवेश नाकारण्यात येत होता. परंतु नुसार प्रत्येक बालकास शिक्षणाचा अधिकार नाकाराता येत नाही. त्यामुळे आज हजारो दिव्यांग बालकांना सामान्य शाळेत सामान्य बालकांबारोबर त्याच्या अध्ययन शैलीनुसार शिक्षण मिळू लागले. त्यासाठी शासनाने शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. दिव्यांग बालकांना कसे शिकवावे या विषयी शिक्षकांना प्रशिक्षण दिली गेली.
दिव्यांग विद्यार्थी शोध मोहिम
सन 2018-2019 मध्ये अंगण्वाडी ताडहादगाव येथे सर्व्हे करताना एक COCHLEAR IMPLANT झालेला कर्णबधिर विदयार्थी सुरज श्रीराम टेकाळे वय 5 वर्ष हा बालक सर्व्हे करताना आढळून आल असता. त्याच्या पालकाचीं भेट घेवून COCHLEAR IMPLANT ऑपरेशन कसे, कुठे, कधी झाले याविषयी सविस्तर चर्चा केली.
त्यात पालकांनी ऑपरेशन करताना आलेल्या अडचणी सांगितल्या,ऑपरेशनसाठी लागलेल्या खर्चीची जुळवा जुळव करणे, ट्रस्टची मदत, ऑपरेशन नंतर होणारा फरक काय हे ही सांगितले. त्यांना या विदयार्थीस घरी बोलण्याचा सराव कसा घ्यावयाचा? , कसे शिकवावे? या विषयी समुपदेशन करण्यात आले. तसेच त्यांना गट साधन केद्र अंबड येथे स्पीच थेरपीरूम मध्ये शब्दाचे उच्चारण करून घेण्यासाठी आठवडयातून दोन दिवस बोलवण्यात आले व त्याची शाळापूर्वी तयारी करून घेण्यात आली.