रोशनचे स्वावलंबन | वैयक्तिक शैक्षणिक आराखडा | Individual Education Program

वेंगुर्ला तालुक्यातील सिद्धेश्वर वाडी, उभादांडा या गावातील इयत्ता ४ थीत शिकणाऱ्या रोशन जयराम तिरोडकर या विद्यार्थ्याची ही यशोगाथा , स्वावलंबन कौशल्य (ADL Skills) आणि घर ते शाळा असा आव्हानात्मक प्रवास आजच्या यशोगाथा मध्ये आपणास वाचायला मिळेल.

md success story

{tocify} $title={Table of Contents}

वैयक्तिक शैक्षणिक आराखडा | Individual Education Program 

विदयार्थी माहिती  -  कु.रोशन जयराम तिरोडकर , सिद्धेश्वरवाडी, उभादांडा ता.वेंगुर्ला 

जन्म तारीख -      19/10/2009    इयत्ता- 4  थी 

दिव्यांग प्रकार-      MD (CP + MR) 

अध्ययन शैली -    बहुअध्ययन शैली

बुद्धीगुणांक -       75%  (Modarate development delay, motor problem) 

शाळा -  जि.प.पूर्ण.प्राथ.शाळा उभादांडा नं.1

कौटुंबिक माहिती 

कुटूंबाचा प्रकार विभक्त कुटुंब आहे. नातेसंबंधात लग्न झालेला आहे. कुटूंबात एकूण पाच व्यक्ती आहेत. त्यापैकी कु.रोशन हा दिव्यांग विद्यार्थी आहे. कु.रोशनचे आई,आजी,गृहिणी आहेत. तर रोशनचे वडील,आजोबा, मोलमजुरी करतात.

वैद्यकीय माहिती 

नातेसंबंधात लग्न झालेलं आहे. रोशनचा जन्मतः वजन १.९०० किग्रॅ.होते. लहान असताना त्याच्या मेंदूला मार लागला.त्यामुळे रोशनच्या विकासाचे टप्पे उशिरा झाले. त्याच बरोबर रोशनच्या चालण्यात,बोलण्यात, प्रमुख समस्या आहेत.

विदयार्थ्यांची इतर अनुषंगिक माहिती -रोशनला बोलून व्यक्त करण्यास समस्या आहे. रोशनला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालून जाण्यास समस्या आहे. वैयक्तिक, शैक्षणिक, सामाजिक कौशल्यात समस्या आहेत.

केसस्टडी निवडण्या मागचा हेतू 

बहुविकलांग केसची माहिती व समस्या सर्व शिक्षक, पालक,यांना समजावी.या केस संबंधित माहितीचा शिक्षक, पालक,व इतर विदयार्थ्यांना फायदा होईल.अशा विद्यार्थ्यांना ADL कौशल्यात प्रगत करता येऊ शकते. म्हणून हि केस निवडण्यात आली.

शाळेचा इतिहास 

कु.रोशन घरीच बसून असायचा. अंगणवाडीत त्याचे नाव होते. प्रत्यक्षात रोशन अंगणवाडीत येत नव्हता. सर्वसाधारण 3 वर्षानंतर मुल अंगणवाडीत येऊन बसायला हवे.परंतु या मुलाबाबत तसे घडले नाही.त्याला कारणही तसेच आहे.

  1. पालकांना वाटायचे की,शाळेत माझ्या पाल्याचा स्वीकार होईल का
  2. माझ्या मुलाला काहीच येत नाही.
  3. माझ्या मुलामुळे इतर मुलांचे नुकसान नको.
  4. माझा मुलगा काय शिकणार अशाप्रकारे विचार पालकांच्या मनात येत असल्याने शाळेत नेत नसत.     

विषेश शिक्षकाने पालकांच्या घरी भेट दिली. पालकांच्या मनातील सर्व शंका ऐकून घेतली. व या मुलांना हाताळायचे कसे यांची वैशिष्ट्ये समजावून सांगितली . उपक्रमांची माहिती दिली. विविध उदाहरणे देऊन पटवून दिले.

पालकांना इतर मुलांची लक्षणे सांगून माहिती दिली. हे सर्व करण्यासाठी जवळ जवळ 10 ते 15 भेटी दिल्या. तेव्हा कुठे पालकांचा,त्यांच्या घरच्यांचा माझ्यावर विश्वास बसला.रोशनला व त्याच्या आईला प्रत्यक्ष माझ्यासोबत अंगणवाडीत घेऊन बसवायचो. त्याला अंगणवाडीची आवड निर्माण केली. अं.वा. मुलांमध्ये त्याला शिकवायचे. सर्वसामान्य मुलांना त्याची सवय झाली. रोशनची आई दररोज न चुकता रोशनला अंगणवाडीत आणायला लागली.

वर्तमान सर ( विविध कौशल्य निहाय )- 

रोशन दररोज अंगवाडीत येऊ लागला.तेंव्हा मी त्याला शाळापूर्व कौशल्य देण्याचे ठरवले.तेव्हा त्याला घसरगुंडी खेळणे, आधार घेऊन चालणे, बाटलीत वाळू भरणे, मुलांमध्ये बसून आहार घेणे.इ कौशल्य शिकवले. अशाप्रकारे शाळेत दाखल होण्यापूर्वी शाळापूर्व कौशल्याचा सराव घेण्यात आला.सदर विध्यार्थी Integrated Support मधून Inclusive Support मध्ये समावेशीत केले आहे.

आव्हाने (शाळा,शिक्षक,पालक) 

पालकांसमोर आव्हान होते की, शाळा व्यवस्थापन समिती (smc) , शाळेतील विदयार्थी रोशनला स्वीकारतील का ? शिक्षकासमोर आव्हान होते की, दिव्यांग विदयार्थ्याला शिकवू कसे?  सर्वसामान्य मुलांकडे लक्ष देऊ की, दिव्यांग मुलाकडे? असे अनेक आव्हान शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा, पालक यांच्यासमोर उभे राहिले.

शिक्षक/पालक यांचे समुपदेशन 

कु.रोशन हा इयत्ता पहिलीत दाखल होणार आहे. हे मी शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक,smc, यांना आधीच सांगितलं.व शिक्षक,मुख्याध्यापक,यांचे समुपदेशन केले . RTE Act चे ट्रेनिंग पण सगळ्यांचे झालेले होते.त्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक,यांचे सहकार्य चांगले  होते. शाळेमध्ये पहिल्याच  दिवशी सर्व मुलांसोबत कु.रोशनचे सुध्दा गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

कृती आराखडा (कौशल्य अनुसरून ) 

वैयक्तिक कौशल्य -

 ग्लास धरून पाणी पिणे, रुमालाने नाक साफ करणे, शी-शु झाल्यावर खुण करून सांगणे. या कौशल्याच्या सरावातुन तो हळूहळू ग्लास हातामध्ये धरू लागला .सूचना दिल्यावर रुमालाच्या साहाय्याने नाक साफ करण्याचा प्रयत्न करू लागला.

शैक्षणिक कौशल्य - 

या कौशल्यात रेघोट्या मारणे,ठिपके जोडणे,बाबा-आई शब्द उच्चारणे अशी कौशल्य निवडले.
कौशलयातील प्रगती -  पाटीवर रेघोट्या मारण्याचा प्रयत्न करतो.बाबा शब्द उच्चारतो.

व्यावसायिक कौशल्य - 

रुमालाची घडी करणे, पेपर फाडणे व गोळा करणे, क्ले ॲक्टिव्हिटी ,इ. क्ले हाताच्या बोटात धरतो व गोळे करण्याचा प्रयत्न करतो.

मनोरंजन कौशल्य - 

घसरगुंडी खेळणे, रोलेटरने शाळेच्या परिसरात फिरणे,मणी ओवणे, इ.घसरगुंडी खेळण्याचा आवड आहे.आधाराने घसरगुंडी चढतो.

यशामध्ये पालक/सवंगडी सहभाग - 

नक्कीच कु.रोशनच्या यशामध्ये पालक म्हणून त्यांची आई व आजोबा यांचा सहभाग खूप मोठा आहे. आई न कंटाळता रेग्युलर रोशनला शाळेत घेऊन येते.

इतर सुविधा (थेरपी व सहाय्यभूत ) -

 कु.रोशनला खालील सोयी- सुविधा देण्यात आलेली आहेत. 1) रोलेटर  2) व्हीलचेअर  3) कॅलिपर 4) बालचित्रवाणी कडून शूटिंग करण्यात आले होते. बालचित्रवाणी कडून 3000/₹ बक्षीस मिळाले. 5) मदतनीस भत्ता

यशस्वी/साध्य झालेल्या बाबी - 

सर्वात महत्वाचे म्हणजे कु.रोशन हा सर्वसामान्य मुलांमध्ये येऊन बसतो. शाळेतील शिक्षक सुध्दा इतर मुलांमध्ये सामावून घेतात. त्याच्याकडे लक्ष सुध्दा देतात. विविध कौशल्य सुध्दा साध्य केलेले आहेत.

पुढील काळात करावयाची कामे -

कु.रोशनला ADL Skill मध्ये स्वावलंबी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आधार घेऊन स्वतः एकटा चालायला शिकवण्याचे प्रयत्न चालू आहेत. जेणेकरून आधार घेऊन शाळेत,वर्गात एकटे जाऊन बसेल.

Post a Comment (0)
Previous Post Next Post

Recent Posts

Facebook