तिच्या अथक प्रयत्नामुळे असाध्य ते साध्य
प्रास्ताविक
या जन्मावर या जीवनावर खूप प्रेम करावे. मी जीवनावर म्हटलो कारण जीवन खूप सुंदर आहे. आणि महत्वपूर्णही तुमच्यासाठी,आमच्यासाठी आणि सर्वांसाठी.
जीवनात अडचणी ज्यालाच येतात,ती व्यक्ती जबाबदारी उचलायला तयार असते आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही. ते जिंकतात किवा शिकतात. जीवन कोणासाठी थांबत नाही.फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न सोडून दिले कि आपोआप सुटतात.
समावेशीत शिक्षण 1960 मध्ये बऱ्याच देशांतून अस्तित्वात आली.1981 च्या आंतरराष्ट्रीय अपंग वर्षापासून या संकल्पनेस चालना मिळून प्रसार झाला.1994 मध्ये भारतासह 92 देश व 25 जागतिक संघटनांनी हा विचार व संकल्पना मान्य केली.
समावेशीत शिक्षण म्हणजे सर्व विध्यार्थ्याचे असे शिक्षण जेथे सर्व विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेत समान सहभाग घेतील. विशेष गरजा असलेल्या विध्यार्थाना सर्वसामान्य विध्यार्थाबरोबर नियमित शाळांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.
नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुका हा आदिवासी तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. अजूनही तालुक्यात म्हणावी तशी प्रगती नाही.अशिक्षितता,दारिद्र्य,अंधश्रद्धा आणि मागासलेपणा यांनी समाज बुरसटलेला आहे.
पेठ शहरापासून 07 कि.मी.अंतरावर कोटंबी हे गाव तिथे श्री.हनुमंत घटके नावाचे इसम राहतात.त्यांना पहिलेच पुत्ररत्न झाले.नाव ठेवले साहिल,जन्मानंतर ताप आल्यामुळे आणि ताप मेंदूत गेल्यामुळे साहिलला बहुविकलांग प्रकारातील दिव्यांगत्व आले.
घरात दिव्यांग मुलगा जन्माला आल्याने साहिलचे वडील त्याला व त्याच्या आईला सोडून गेले.घरात कोणाचाही आधार नाही फक्त एक आजी आणि ती देखील वयाने म्हातारी साहिलची आई श्रीम.पुष्पा यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला आजीचा साभाळ करायचा कि दिव्यांग मुलाचा आणि संघर्ष सुरु झाला.
आयुष्यात तीन संघर्ष असतात. 1.जगण्यासाठी संघर्ष 2.ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष 3.ओळख टिकविण्यासाठीचा संघर्ष {alertInfo}
विद्यार्थी माहिती
- विद्यार्थी नाव :- कु.साहिल हनुमंत घटके
- जन्मदिनांक :- 04/07/2009
- जात:- हिंदू कोकणा
- दिव्यांग प्रकार:- बहुविकलांग
- शाळा :- जि.प.प्राथ.शाळा कोटंबी (क) केंद्र पेठ ता.पेठ जि.नाशिक
- इयत्ता :- 4 थी.
कौटुंबिक माहिती
- वडिलांचे नाव :- श्री.हनुमंत घटके
- आईचे नाव :- श्रीम.पुष्पा हनुमंत घटके
- वय :- 30 वर्ष
- शिक्षण :- 4 थी.
- व्यवसाय :- मजुरी
- मातृभाषा :- मराठी
- बोलीभाषा :- मराठी
वैद्यकीय माहिती
- जन्मानंतर ताप आल्यामुळे आणि ताप मेंदूत गेल्यामुळे त्याला बहुविकलांग या प्रकारातील दिव्यांगत्व आले.
- वाढीच्या टप्प्यानुसार त्याची शारीरिक,मानसिक व बौद्धिक क्षमता विकसित झालेली नाही.
- अंगणवाडीत प्रवेशित असतांना विशेष शिक्षिका श्रीम.लीना महाले यांनी सदर पालकांशी संपर्क केला.
- घरी जावून त्यांची भेट घेतली.त्यावेळी साहिल पूर्णपणे झोपलेल्या अवस्थेत होता.विशेष शिक्षकांनी पालकांचे समुपदेशन करून विविध शिबिरांना विद्यार्थ्यांला उपस्थित ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले.
- ग्रामीण रुग्णालय पेठ तसेच जिल्हा रुग्णालय नाशिक येथे तपासणी केली असता.साहिलचे दिव्यांगत्व शोधून त्याला प्रमाणपत्र देण्यात आले व फ़िजिओथेरपीसाठी संदर्भीत करण्यात आले.
विद्यार्थ्यांची इतर अनुषंगिक माहिती
- विद्यार्थ्यांचे वडील त्याला आणि त्याच्या आईला सोडून गेलेले आहेत
- विध्यार्थ्यांची पालनपोषण करण्याची पूर्ण जबाबदारी त्याच्या आईवरच आहे.
केसस्टडी निवडण्यामागचा हेतू
- विद्यार्थी बहुविकलांग दिव्यांग प्रकारातील असून त्याला बोलता,चालता येत नाही.
- कोणावरही अवलंबून न राहता वैयक्तिक कौशल्ये विकसित करणे.
शाळेचा इतिहास
- पालक समुपदेशन (अंगणवाडीत प्रवेश घेण्याबाबत)
- अंगणवाडी कोटंबी येथे प्रवेश
- अंगणवाडी ताई मार्गदर्शन
- सन 2014 – 15 इ. 1 लीत प्रवेश
- सन 2020 – 21 इ.4 थी शिक्षण सुरु
वर्तमान स्तर
अं.क्र |
विद्यार्थी नाव |
शाळेचे नाव |
अध्ययन शैली |
वैद्यकीय दृष्ट्या दिव्यांग प्रकार |
वर्तमान स्तर |
|
---|---|---|---|---|---|---|
इ. | ||||||
1 |
कु.साहिल हनुमंत घटके |
जि.प.प्राथ. शाळा कोटंबी(क) |
4 थी. |
बहु अध्ययन शैली |
बहुविकलांग |
विद्यार्थ्याला सूचना समजतात. |
आव्हाने
- पालकांना खंबीर करणे आवश्यक
- रोजचे जीवन जगणे एक आव्हान
- नियमित शाळेत न येणे
- शाळेत पूर्ण वेळ न थांबणे
- पालक,शिक्षक असुरक्षित भावना
- घरापासून शाळेचे अंतर लांब असल्याने नियमित शाळेत येण्याबाबत समस्या
- पालकांचे स्थलांतर
कृती आराखडा ( सुरूवात)
अं.क्र |
विद्यार्थी नाव |
शाळेचे नाव |
अध्ययन शैली |
वैद्यकीय दृष्ट्या दिव्यांग प्रकार |
वर्तमान स्तर |
|
---|---|---|---|---|---|---|
इ. | ||||||
1 |
कु.साहिल हनुमंत घटके |
जि.प.प्राथ. शाळा कोटंबी(क) |
4 थी. |
बहु अध्ययन शैली |
बहुविकलांग |
विद्यार्थ्याला सूचना समजतात. |
कृतीची मालिका व अंमलबजावणी
फ़िजिओथेरपी व्यायाम
यशामध्ये पालक / सवंगडी सहभाग
संकटात सापडल्यावरच माणूस स्वतः ला ओळखतो. जशी झाडाला पाण्याची गरज असते,तशी लेकराला मायेची गरज असते. साहिलला आज चालता येते त्याचे सर्व श्रेय त्याची आई आणि आजी यांना जाते.{alertInfo}
इतर सुविधा ( थेरपी व सहाय्यभूत )
शिक्षक / पालक यांचे समुपदेशन
- सदर विदर्थ्यांबददल अंगणवाडीताईंनी विशेष शिक्षकांना माहिती दिली त्या नंतर वि शेष शिक्षकांनी विदयार्थ्यांच्या घरी जावून पालकांचे समूपदेशन केले.
- समता व समानता संकल्पना समजावून सांगितली.
- प्रत्येक मूल शिकू शकतो हा विचार समजावून सांगितला.
- दिव्यांग वि दयार्थ्यांच्या नांवाने शाळेचे अपयश दाखवणारी प्रवृत्ती बद्दलली पाहिजेत या विषयी समुपदेशन.
यशस्वी/साध्य झालेल्या बाबी :-
पुढील काळात करावयाची कामे :-
- FACP चेकलिस्टवरून साहिलची बेसलाईन काढून त्याला वैयक्तीक कौशल्य विकसीत करण्या करीता नियोजन केले.
- कोणाचीही मदत न घेता साहिलला स्वत: चालता आले पाहिजे.
- शैक्षणीक कौशल्य विकसीत करण्याकरीता नियोजन.