रायगड जिल्ह्यातील एका दुर्गम भागातील शाळा तळई गावातील प्रल्हाद ची यशोगाथा त्यांच्या वर्गशिक्षकांनी मांडली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील समावेशित शिक्षणातील एक आशेचा किरण यशोगाथा
वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा असे वाटत असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकण्याची पध्दत ,गती वेगळी आहे. विद्यार्थ्यांच्या गरजेप्रमाणे नवनवीन उपक्रम राबविले पाहिजेत . तरच आपण यशस्वी होऊ शकतो. याचा अनुभव मला आला , तो या यशोगाथेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
एक आशेचा किरण..| Inclusive Education success story
माझी शाळा पाली गावापासून दोन किलोमीटरवर सरसगडाच्या अर्ध्या उंचीवरच इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत. सन 2018-19 शैक्षणिक वर्ष सुरु झाले . दर वर्षाप्रमाणे पटनोंदणी सुरु केली . इयत्ता पहिलीला प्रल्हाद अनिल वाघमारे नावाचा विद्यार्थी दाखल केला.त्याचा मोठा भाऊ प्रदिप तीसरीत शिकत होता त्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती बिकट आहे. कशी आहे ते मला माहित होते .
गावातील 80टक्के लोक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी परजिल्ह्यात वर्षातील आठ ,नऊ महिने स्थलांतर करतात त्याप्रमाणे प्रल्हादचे आई - वडील स्थलांतर करतात .
त्यामुळे प्रल्हादला मी पाहिले नव्हते. प्रथमच मी त्याचे निरिक्षण केले , सतत त्याची लळ गळत होती , त्याला एक ,दोन शब्द सुध्दा बोलता येत नव्हते, एका जागेवर स्थिर बसत नव्हता . हा कसा शिकेल , त्याला काय शिकवावे असा मोठा प्रश्न मला पडला .
जुन महिना गेला ,जुलै महिना गेला, तो कधीतरी शाळेत यायचा आणि लगेच जायचा. एके दिवशी आमचे पंचायत समितीचे समावेशित शिक्षण विशेष तज्ञ श्री.मुंढे सरांनसोबत प्रल्हाद विषयी बोललो नेमके कोणत्या प्रकारचे दिव्यांग असेल . तर सर बोलले मी शाळेत त्याला पाहण्यासाठी येतो. काही दिवसातच सर शाळेत आले प्रल्हादला व त्याच्या आईला घरीहून बोलवण्यात आले.
> सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्सची) घोषणा | Bridge Course announcement
प्रल्हादच्या आईला काही प्रश्न विचारुन माहिती लिहून घेतली. प्रल्हादचे निरीक्षण करुन त्याच्याशी संवाद साधला.पालक गेल्यानंतर प्रल्हादला कोणकोणते उपक्रम घ्यावे ते सांगितले. इतर मुलांबरोबर तुलना न करता हे उपक्रम राबविण्यात यावे , प्रथम प्रल्हादचा प्रतिसाद कमी असेल पण हळूहळू वाढेल असे सांगितले.
त्याप्रमाणे उपक्रम घ्याण्याचे ठरविले आँगस्ट महिन्याचे दिवस अचानक प्रल्हाद हळूहळू इकडून तिकडे डुलत डुलत बिना कपड्यात शाळेत आला आणि त्याच्या भावाजवळ येऊन वर्गात बसला पण तो बिना कपड्याचा आल्यामुळे त्याच्या भावाला म्हणजे प्रदिपला कमीपणा वाटला असेल , लगेच प्रदिपने प्रल्हादला उचलून घरी घेऊन गेला आणि आईकडे सोडून आला.अस त्या आठवड्यात तीन वेळा वर्गात आला आणि त्याच्या भावाकडून तीच सतत प्रक्रिया पार पडली . माझ्या मनात एक विचार आला की सर्वसाधारण मुलाना आपण चांगल शिक्षण देऊ शकतो मग ह्या दिव्यांग बालकांनी काय पाप केले की त्याला शिक्षण मिळत नाही.
मी ठरवल आता याला घडवायचेच एक दिवशी असच शाळेत प्रल्हाद आला आणि नेहमी सारखा त्याचा भाऊ उचलत होता त्याला मी उचलू नको. अस सांगितल आणि त्याला बोललो की जा त्याचे कपडे घेऊन ये मग तो घरी गेला आणि प्रल्हादचे कपडे घेऊन आला आणि त्याला कपडे घातले आणि मी प्रल्हादला जवळ घेतल तर तो शांत बसला मंग मी त्याला वर्गातील खेळणी दिली,
खेळत बसला एक तास भर दुसऱ्या दिवशी तिच्या आईला बोललो की प्रल्हादला रोज कपडे घालून शाळेत घेऊ येत जा आणि त्याची आई रोज त्याला सोडून जायची आणि दोन तासानी घेऊन जायची कारण लाळ गळत असल्यामुळे शर्ट घाण होत होता.
त्याचा काहीवेळ आता शाळेत अनंदात जात होता इतर मुले त्याला मदत करत होती. नंतर ऑक्टोबरमध्ये त्याच्या आई, वाडीलासोबत कामानिमित्त स्थलांतरीत झाला आणि थेट 2019 जून मध्येच गावात आला जेव्हा तो बाहेर जिल्ह्यतून गावात आल्या पहिला शाळेत धावत आला आणि आ....आ.. अस आवाज ऊच्चारला त्याच दिवशी मला त्याच्यात एक आशेचा किरण दिसला ..
दोन दिवसांनी शाळेत आला कपडे घालून आणि माझ्या जवळ बसला मग त्याला हळूच शाळेतले साहित्य देऊन गोडी निर्माण केली , त्याला चित्र दाखवून थोडे बोलते केले.
अ अननस ,आ आई अशा प्रकारे मुळअक्षरे रोज त्याचे वाचन घ्यायचो आणि तोडक्या मोडक्या शब्दात तो मागे मागे बोलायचा माती काम , लेझीम पथक अशा विविध प्रकारच्या खेळात इतर प्रत्येक उपक्रमात मुलांसोबत त्याचा सहभाग मी आवर्जून करुन घेतला. सर्व मुले त्याला आवडीने जवळ घ्यायची नंतर त्यांची लाळ गळायची तेव्हा तो स्वतः हात रुमालाने पूसायचा सर्व मुलांसोबत प्रत्येक उपक्रमत आता तो भाग घेतो होता, पण सर्वात मागे असायचा.
अशातच आमचे अलिबागला पाच दिवसाचे दिव्यांग मुलांसाठीचे प्रशिक्षण झाले त्यात मला आणखी दिशा मिळाली कसे शिकवावे, कसे मूल्यमापन करावे या बाबत पूर्ण प्रशिक्षण घेऊन त्या नुसार मी त्याचे मूल्यमापन पण केले.
आता त्यात बऱ्या पैकी सुधारणा झाली आहे सध्या त्याच्या हाताची बोटे वळत नसल्याने लिहता येत नाही पण बाकी इतर काही करतो . प्रल्हाद 100% सर्वच बरोबर करतो असे नाही पण करण्याचा प्रयत्न करतो . ते पाहून मला खूप समाधान मिळते.
एक गोष्ट आहे जर ठरवले तर काहीही होऊ शकते.