कोरोनाच्या काळात वर्षभर शाळा बंद आहेत, मात्र शाळा बंद,पण शिक्षण सुरु या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन/ऑफलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक मुल वेगळे आहे. आणि ते आपल्या गतीने शिकत असते. प्रत्येकाची आव्हाने वेगळी आहे.
वाकडी (मोहगाव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लक्ष अशोक दखने या दिव्यांग विद्यार्थ्याने पालकांच्या सहाय्याने समावेशित शिक्षण यंत्रणेतील एम.एस.डोंगरे , संतोष .के. लेनगुरे तसेच वर्गशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आपले शिक्षण सुरु ठेवले आहे. याविषयीचा मागोवा आजच्या यशोगाथा मध्ये पाहणार आहोत.
> सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्सची) घोषणा | Bridge Course announcement
{tocify} $title={Table of Contents}
दिव्यांग विद्यार्थ्यांचे कोरोना कालावधीतील शिक्षण | education of divyang students in Corona period
विद्यार्थी माहिती
विद्यार्थ्यांचे नाव :- लक्ष अशोक दखने
वय :- 10
वर्ग :- 3 रा
प्रवर्ग :- कर्णबधीर
शाळेचे नाव :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा – वाकडी (मोहगाव)
संसाधन शिक्षकाचे नाव :- संतोष .के. लेनगुरे
विशेष तज्ञ नाव :- एम.एस.डोंगरे
कुटुंबाची पार्श्वभूमी
लक्ष अशोक दखने हा मुलगा अंगणवाडीच्या सर्वेक्षणानुसार शोधण्यात आला .त्याला एकू येत नव्हते व फार बोलता येत नाही. लक्ष हा दृश्य अध्ययन शैलीने शिकणारा विद्यार्थी आहे. त्याचे वडील मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचे उदार निर्वाह करतात. आणि मुलाचे संगोपन करतात.
> अध्ययन शैली व अध्ययन शैलीचे प्रकार
लक्ष हा आधी पासुन कर्णबधीर असून त्याला ऐकू येत नाही, तसेच बोलता पण येत नाही .त्यामुळे कसे काय शिकवावे? तसेच आपला मुलगा आपल्या सोबत ऐकून बोलू शकेल का ? अशी पालकाची द्विधा अवस्था होती .
त्यात माझी व अंगणवाडी सेविका तसेच वडील यांच्यात मी स्वतः मध्येस्ठी भूमिका पार पाडून त्यावर सखोल चर्चा करण्यात आली तसेच त्यांना पटवून देण्यात आले कि ,आपले मुल ऐकून घेऊन बोलण्याचा प्रयत्न नक्की करेल काही कालावधी लागणार असे सांगण्यात आले.
तेंव्हाच पालक व मी अंगणवाडी पासून त्याचे टप्पे निहाय असे त्याला मार्गदर्शन करणे व अध्यापन करणे सुरु केले. लक्ष आज वर्ग 3 री मध्ये जिल्हा परिषद शाळा वाकडी येथे शिक्षण घेत आहे .व त्याला उन्हाळा चे दोन महिने school redyness programme (SRP) अंतर्गत प्रत्यक्ष on call च्या माध्यमाने covid -19 च्या प्रादुर्भावाने कोरोना कालावधीत घेतलेले उपक्रम खालील प्रमाणे राबविण्यात आले .
वैयक्तिक स्वच्छता
लक्ष ला on call करून सर्व प्रथम कोरोना म्हणजे काय ? हे मुलाला पटून देण्यात आले .आपण कसे राहिले पाहिजे. स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे, कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे.सर्व प्रथम लक्ष ला तोंडावर मास्क लावणे व साबणाने स्वच्छ हात धुणे ,व लोकांच्या गर्दी मध्ये न फिरणे .बोलताना सामाजिक अंतर राखणे .व बाहेर गेल्यास sanitizer चा वापर करणे. याबाबत पालक व विद्यार्थी यांना समुपदेशन करून follow up घेण्यात आला.
अध्ययन-अध्यापन
लक्ष च्या अभ्यासाविषयी त्याच्या बहिणीला दोन, तीन व चार अक्षरी शब्द चा वाचन करून ते एका वही वर लिहायला सांगण्यात आले. उदा. वारा ,प्रकाश, तहान,सावली,कासावीस,धबधबा या शब्दाचे लक्ष ला ग्रहण करून बोलायला सांगितले. नंतर लक्ष ऐकून घ्यायचा थोडा फार प्रमाणात म्हणण्याचा प्रयत्न करीत असे ,व बहिण त्याच्या वही वर प्रकाश, तहान ,तीन व चार शब्द लिहून घेण्याचा सराव करून घेतला.
वाचा प्रशिक्षण कार्य
घरातील भावंडामार्फत स्पीच थेरेपी 1) मी आज सकाळी उठलो. 2) मी आज सकाळीच ब्रश केला. 3)ब्रश केल्या नंतर आंघोळ केली. 4) आंघोळ केल्या नंतर जेवण केले. असे वाक्य बहिणीला एका कोऱ्या मोठ्या कागदावर लिहायला सांगितले. नंतर त्याला तोंडाला मास्क लाऊन मी सांगते ते तू स्वतः म्हण. लक्ष त्या चार वाक्य म्हणायला लावले.
लगेच क्रमवार बहिण व लक्ष म्हणायला सांगितले .लक्ष त्यातील मी आज सकाळी ब्रश केलो व अंघोळ सकाळी केलो असे अडखळत म्हणायला सुरुवात केली. म्हणजेच वरील वाक्यामधील ब्रश ,सकाळ, आंघोळ,जेवण ,ताट, भाजी, शेंगा व पाणी याची सांगड त्या वरील शब्दाशि वारंवार करून व पुनरुच्चार करायला लावले. त्यात लक्ष चे वाचा प्रशिक्षण व येणारे शब्द नेहमी त्याच्या कानावर पडणे अपेक्षित आहे व ते करून घेतले .
संभाषण
लक्ष ला on call करून त्याच्या बहिणीला सांगण्यात आले कि मी जे फोने वर सांगतो ते प्रत्यक्ष एका वही वरती लिहून घे 1) पेन हा निळ्या शाही चा आहे. 2) पेन हा निळ्या व लाल रंगाची असते. 3) पेन हा कोऱ्या पानावरती व आपल्या वही वरती लेखन करण्या करिता असते. असे वाक्य बहिणीला लिहायला सांगितले. व लगेच लक्ष ला तू स्वतः (बहिण )वरील वाक्य हळुवार म्हणून नंतर लक्ष ला म्हण्याला व बोलायला लाव अश्या प्रकारे लक्ष फक्त माझ्या कडे निळ्या रंगाची पेन आहे .व ती माझीच आहे. मी तुला नाही देत असे अडखळत तीन ते पाच मिनिट नंतर म्हणायचं प्रयत्न केला म्हणजेच जे अपेक्षित पाहिजे होते ती पेन वरून ते वाक्य दोघा मध्ये संभाषण प्रक्रिया पर पडली. ताई म्हणाली होय तुझीच पेन आहे . अश्या प्रकारे संभाषण प्रक्रिया घेण्यात आली.
मनोरंजनात्मक कार्य
लक्ष च्या त्याच्या बहिणीला TV वरील लहान मुलं जे कार्टून पाहतात. त्याची आवड आहे का? बहिण म्हणाली होय. लक्ष बाहेरील वातावरणात व मुलांच्या वातावरणात खेळता येत नाही त्या साठी लक्ष ला कंटाळा आला असतो म्हणून जे TV वर कार्टून गाणे picture पाहायला लावणे याच्यातच त्याला खूप आनंद मिळतो पुढील मार्गदर्शन व अध्यापनात नेहमी सक्रीय सहभाग घेऊ शकतो .
शारीरिक हालचाली व प्राणायामचे धडे
कोरोना कालावधी मध्ये आपल्या शरीराची हालचाल आवश्यक आहे. म्हणून मी त्याच्या बहिणीला जे व्यायाम येतात किंवा तुझ्या शाळेत शिकविले जाणारे शारीरिक व्यायाम लक्ष ला करायला लावा .व थोड्या फार प्रमाणात प्राणायाम श्वासोच्छवास आत घेणे, बाहेर सोडणे अश्या प्रकारे बहिणीकडून व्यायाम करून घ्यायचे व लक्ष तश्या प्रकारे व्यायाम करत असे .
फलनिष्पत्ती
- बहिण व भाऊ (लक्ष) याला बहिणीच्या माध्यमातून दोन अक्षरी शब्दांचे वाचन, अक्षरी शब्दांचे वाचन, चार अक्षरी शब्दांचे वाचन करून लेखन करता येऊ लागले.
- लक्ष लं बहिणीच्या सहकार्यातून चित्र पाहून आज सकाळी उठलो, ब्रश केले व वरील वाक्य च्या अनुषंगाने येणारे शब्द ब्रश, पाणी, बाटली, साबण हे शब्द ऐकून ग्रहण करून स्व-अभिव्यक्ती क्रिया पर पाडता आली.
- लक्ष बहिणीच्या माध्यमातून स्वतः व वाचन लेखन त्याच प्रकारे ऐकून म्हणण्याचा प्रयत्न करतो.
- प्राणायाम करण्याचा प्रयत्न करतो.
सारांश
दिव्यांग विद्यार्थ्यांचे कोरोना कालावधीतील शिक्षण शाळा बंद, पण शिक्षण सुरु अंतर्गत On Call उपक्रमातंर्गत कार्यक्षेत्रातील लक्ष या ( कर्णबधीर-दिव्यांग) विद्यार्थ्यांची यशोगाथा सादर केली आहे. On Call मार्गदर्शनामुळे भावंडांच्या मदतीने लक्ष चे स्पीच थेरेपी , वाचन-लेखन कौशल्य तसेच मनोरंजनात्मक कौशल्य विकसित मदत झाली. यामुळे कोरोनाच्या काळात माझ्या मुलांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी घेतलेला follow up यामुळे पालकांमध्ये मुलांच्या शिकण्याविषयीचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.