{tocify} $title={Table of Contents}
दिव्यांग विद्यार्थ्यांनी भरला दिपोत्सवात रंग |Divyang Student Activities
प्रस्तावना
समावेशीत शिक्षण 1960 मध्ये बऱ्याच देशांतून अस्तित्वात आली. 1981 च्या आंतरराष्ट्रीय अपंग वर्षापासून या संकल्पनेस चालना मिळून प्रसार झाला. 1994 मध्ये भारतासह 92 देश व 25 जागतिक संघटनांनी हा विचार व संकल्पना मान्य केली.
समावेशीत शिक्षण म्हणजे सर्व विध्यार्थ्याचे असे शिक्षण जेथे सर्व विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेत समान सहभाग घेतील. विशेष गरजा असलेल्या विध्यार्थाना सर्वसामान्य विध्यार्थाबरोबर नियमित शाळांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नाशिक, समग्र शिक्षा अभियान पंचायत समिती पेठ समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दि.16 ऑक्टो.2019 रोजी जि.प.प्राथ.शाळा शिवशेत केंद आंबे येथे दिव्यांग मुलांसाठी पणत्या रंगविण्याचा उपक्रम घेण्यात आला.
आपल्या भारतात सगळ्या प्रकारच्या धर्माची लोक राहतात वर्षभर आपल्याकडे सण साजरे होत असतात.असाच एक सण म्हणजे दिवाळी.
लक्ष लक्ष दिव्यांचा सण म्हणजे दिपावली या पार्श्वभूमीवर पेठ तालुक्यातील दिव्यांग विध्यार्थानी रंगीबेरंगी दिप उजळवून त्यात रंग भरले.
मांगल्याचे प्रतीक म्हणजे पणती काळ बदलला,घर बदलली साहजिकच सणांच स्वरूप बदललं पण वाडा असो व चाळ,बंगला असो व प्लाट सारं काही उजळवून टाकण्यासाठी प्रकाशित करण्यासाठी “पणती” हवीच.पणती सजवताना हौसेला मोल नसते हेच खरे.
बाजारात आकर्षण पणत्या असल्या तरी स्वतःरंगविलेल्या पणत्या विक्रीबरोबरच दिवाळीची खास भेटवस्तू म्हणूनही आप्तेष्टांना देता येतात.
मनात आणलं तर अशक्य असे काहीही नसते.याची प्रेरणात्मक प्रचिती दिव्यांग विद्यार्थी यांच्याकडे बघितले की येते.
विध्यार्थाच्या शैक्षणिक विकासाबरोबरच व्यक्तिमत्व विकास व्हावा.आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने दि. 16 ऑक्टोबर 2019 रोजी पेठ तालुक्यातील आंबे व जोगमोडी केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी यांच्यासाठी पणती रंगविणे हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थी हे सर्वसामान्य मुलांसोबत काम करून आत्मनिर्भर बनतील.त्यांना स्वावलंबी बनविणे,त्यांचा आत्मविश्वास वाढविणे. आपले मुल इतर मुलांबरोबर शिकू शकते ही जाणीव पालकांमध्ये निर्माण करणे.आपले मुल दिव्यांग आहे पण त्याच्या उर्वरित क्षमतांचा वापर करून आपण आपल्या पाल्याचा जास्तीत जास्त विकास करू शकतो ही भावना शिक्षक,पालक यांच्यामध्ये दृढ करणे.आर्थिक गरज भागविण्यासाठी व्यावसायिक कौशल्य शिकविणे हा त्यामागील उद्देश होय.
आपल्या भारतात सगळ्या प्रकारच्या धर्माची लोक राहतात वर्षभर आपल्याकडे सण साजरे होत असतात.असाच एक सण म्हणजे दिवाळी.
लक्ष लक्ष दिव्यांचा सण म्हणजे दिपावली या पार्श्वभूमीवर पेठ तालुक्यातील दिव्यांग विध्यार्थानी रंगीबेरंगी दिप उजळवून त्यात रंग भरले.
उपक्रमाची गरज व महत्व
- दिव्यांग विद्यार्थी हे सर्वसामान्य मुलांसोबत काम करून आत्मनिर्भर बनतील.त्यांना स्वावलंबी बनविणे,त्यांचा आत्मविश्वास वाढविणे.
- आपले मुल इतर मुलांबरोबर शिकू शकते ही जाणीव पालकांमध्ये निर्माण करणे.
- आपले मुल दिव्यांग आहे पण त्याच्या उर्वरित क्षमतांचा वापर करून आपण आपल्या पाल्याचा जास्तीत जास्त विकास करू शकतो ही भावना शिक्षक,पालक यांच्यामध्ये दृढ करणे.
- आर्थिक गरज भागविण्यासाठी
उपक्रमाची उद्दिष्टे
- प्रत्येक दिव्यांग मुलांत शिकण्याची क्षमता असते असा आत्मविश्वास शिक्षक,पालक यांच्यामध्ये निर्माण करणे.
- विध्यार्थाच्या सुप्त गुणांना वाव देणे.
- सर्व विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेत समान सहभाग घेतील.
- विशेष गरजा असलेल्या विध्यार्थाना सर्वसामान्य विध्यार्थाबरोबर शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.
- आपले मुल दिव्यांग आहे पण त्याच्या उर्वरित क्षमतांचा वापर करून आपण आपल्या पाल्याचा जास्तीत जास्त विकास करू शकतो ही भावना शिक्षक,पालक यांच्यामध्ये दृढ करणे.
नवोपक्रमाचे नियोजन - उपक्रमपूर्व स्थितीचे निरीक्षण
- विद्यार्थी आवड
- विध्यार्थाच्या हाताच्या व बोटाच्या हालचाली योग्यरितीने होतात.
- संबधित व्यक्तींशी,तज्ञांशी चर्चा.
- गटशिक्षणाधिकारी,वि.अ.,के.प्र.
- बिटातील मुख्याध्यापक,शिक्षक,तज्ञशिक्षक,कलाशिक्षक
- BRC विषयतज्ञ,विशेषतज्ञ,विशेष शिक्षक
आवश्यक साधनांचा विचार
- ज्या वस्तूंना खूप खर्च नसतो.
- ज्या अगदी सहज पण डोळसपणे आजूबाजूला लक्ष ठेवले तर मिळू शकतील,अशाच वस्तूंमधून मुलांना कलानिर्मिती करायला शिकवायचे म्हणून
- टाकाऊ पासून टिकावू
करावयाच्या कृतीचा क्रम
- सर्वसाधारणपणे सामान्य मुले ज्या गोष्टी करू शकतात त्या cwsn मुलांना करता येतातच असे नाही.
- वर्षाच्या सुरुवातीलाच मी मुलांना ज्या वस्तू ( टाकाऊ ) जमवायच्या त्यांची यादी लिहून देत असे.
- कला शिक्षक यांच्या मदतीने प्रथम मुलांना वस्तू करून दाखवून ती त्यांना रोज दिसेल अशी शाळेत ठेवत असे.
- शाळेत शिकणारा विद्यार्थी,त्याच शाळेत शिकणारी त्याची मोठी भावंडे किवा शाळेत काही ना काही कारणाने येणारे पालकही कुतुहलाने सर्व कलाकृती पाहत आणि मुलांना त्या बनवायला मदत करत असत.
उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण
- आपणही काही करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण होणे
- एकाग्रता वाढणे.
कार्यवाहीचे टप्पे ( वेळापत्रक )
- सुरुवातीला आठवड्यातून दोनदा केंद्रात,बिटात जाऊन विद्यार्थी निवड करणे.
- गट तयार करणे.( सर्वसामान्य विद्यार्थी व cwsn विद्यार्थी यांचा एकत्रित )
- पालक,शिक्षक चर्चा
- घरातील टाकावू वस्तू याची यादी तयार करणे.
- रोज मधल्या सुट्टीत कला शिक्षक यांच्या मदतीने टाकावू वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनविणे.
- शाळेत वस्तू विध्यार्थाना दिसेल अशी ठेवणे
उपक्रमासाठी इतरांची मदत
- पालक,घरातील मोठी भावंडे
- वर्गमित्र
उपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे
- उपक्रमाचे फोटो
- उपक्रमाचा video लिंक
उपक्रमाची कार्यपद्धती पूर्वस्थितीची निरीक्षणे व त्यांच्या नोंदी
- विद्यार्थी हाताच्या व बोटाच्या हालचाली व्यवस्थित करतात.
- विद्यार्थी रोज शाळेत येतात.
कार्यवाहीदरम्यान निरीक्षणे व माहिती संकलन
- विद्यार्थी आवड
- एका जागी बसणे
- एकाग्रतेत वाढ
उपक्रम पूर्ण झाल्यावर निरीक्षणे व त्यांच्या नोंदी
- एकाग्रतेत वाढ
- व्यावसायीक कौशल्य विकासास वाव
- वर्तणूक समस्या कमी होण्यास मदत
- सर्व सामान्य मुलांबरोबर अध्ययन प्रक्रियेत समान सहभाग
- आत्मविश्वास वाढ
- पणती रंगविल्याचा आनंद
कार्यवाहीत आलेल्या अडचणी
कोणतेही कार्य हे अडथळयांशिवाय पार पडत नाही.शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.{alertInfo}
- विद्यार्थी विखुरलेले असल्यामुळे त्यांना एकत्रितपणे उपक्रम राबवायला अडचण
- आदिवासी व दुर्गम भाग असल्याने दळण-वळण अडचण
- केंद्रस्तर,गटस्तरावर व्यावसायिक कौशल्य विकसित झाल्यास विध्यार्थाच्या कला गुणांना अधिक वाव मिळेल.
उपक्रमाची यशस्विता / फलनिष्पत्ती ( उद्दिष्टानुसार )
ख्वाहीश भले छोटीसी हो…लेकिन उसे पुरा करने के लिए दिल जिद्दी होना चाहिए.{alertInfo}
- दिव्यांग विध्यार्थाच्या कला गुणांना वाव
- आपले मुल दिव्यांग आहे पण त्याच्या उर्वरित क्षमतांचा वापर करून आपण आपल्या पाल्याचा जास्तीत जास्त विकास करू शकतो ही भावना शिक्षक,पालक यांच्यामध्ये निर्माण झाली.
- टाकाऊ सामान याचा वापर करून टिकाऊ आणि देखण्या वस्तू बनवण्याचा आनंद किती मोठा असतो हे समजण्यासाठी अशा वस्तू एकदा तरी बनवायला हव्यात.
- आपले मुल इतर मुलांबरोबर शिकू शकते ही जाणीव पालकांमध्ये निर्माण झाली.
समारोप
- उपक्रमाकरिता लागणाऱ्या सर्व गोष्टी उपलब्ध होऊन उपक्रम आयोजित केलेल्या शाळेत सर्व मुले एकत्रितपणे वेळेवर उपस्थितीत राहिली.
- दिव्यांग विद्यार्थी यांचे व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी आहे त्या परिस्थितीत उपक्रम यशस्वी झाल्याने अस्वस्थता दूर झाली.
- टाकून दिलेल्या वस्तूंतून काहीतरी नवे बनविणे.
- टाकाऊ सामान याचा वापर करून टिकाऊ आणि देखण्या वस्तू बनवण्याचा आनंद किती मोठा असतो हे समजण्यासाठी अशा वस्तू एकदा तरी बनवायला हव्यात.
संदर्भसूची व परिशिष्टे
- समावेशित शिक्षण प्राथ.टप्पा हस्तपुस्तिका
- RTE ACT 2009 चे वाचन
- RPWD ACT 2016
- सहभागी वर्गातील एकूण २४ विद्यार्थी
यशोगाथा प्रकाशनासाठी उमेश सरांचे खूप छान प्रयत्न,तसेच नितीन पठाडे विशेष शिक्षक, तालुका पेठ,जिल्हा नाशिक,यांच्या कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. एवढंच पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो.त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाचा मार्ग नक्की सापडतो.
ReplyDelete