कोरोनामुळे सन २०२०-२१ मध्ये मुलांचे शाळेत जाने बंद असले तरीही ऑनलाईन शिक्षण देणे सुरू होते. याच अनुषंगाने सामान्य मुलाप्रमाणे दिव्यांग मुलांनाही ऑनलाईन शिक्षण मिळावे या करीता प्रत्येक दिव्यांग प्रकारच्या मुलांकरीता ऑनलाईन शिक्षण देण्यात आले .
आरुषी अजाबराव गेडाम ही अंध विद्यार्थीनी सन २०२०-२१ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दिलावरपूर, केंद्र-शिरजगाव (को) पं. स.चांदुर रेल्वे येथील शाळेत इयत्ता ३ री मध्ये शिक्षण घेत होती. आरुषीची घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे तिच्या घरी अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नव्हता, त्यामुळे ती ऑनलाईन क्लासला उपस्थित राहू शकत नव्हती.
आरुषी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहू नये, तिला देखील ऑनलाईन शिक्षण मिळावे त्याकरीता मी विशेष शिक्षक सुनिल धोंडे (प्रवर्ग-अंध) व विशेष तज्ञ -श्री विजय दवाळे दर सोमवारी प्रत्येक्ष दिलावरपूर येथे जाऊन आरुषीला ऑनलाईन virtual class ला जॉईन केले .
आरुषी च्या घरी नेटवर्क नसल्यामुळे गावातील रोडवर बसस्टॉपवर जाऊन सर्व ऑनलाईन क्लास यशस्वी केले . सोबत आरुषी चे वडील, लहान बहीण राहायची. यासोबतच प्रत्येक्ष शैक्षणिक, वैयक्तिक आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा या बाबत मार्गदर्शन केले.
आरुषीचा अभ्यास करून घेण्याबाबत पालकाला प्रत्येकवेळी मार्गदर्शन केले. आता आरुषी इयत्ता तिसरी पास होऊन चौथी मध्ये गेलेली आहे.
ऑनलाईन शिक्षण सुविधा अभावी पूरक जरी ठरत नसेल मात्र पर्याय म्हणून आम्ही समावेशित शिक्षण टीम च्या माध्यमातून आरुषीला शिक्षण प्रवाहामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
सुनील व. धोंडे , विशेष शिक्षक (प्रवर्ग - अंध), पं. स.चांदुर रेल्वे
> दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचे पर्याय | Online Education for Divyang students
$ads={2}
> दिव्यांग विद्यार्थ्यांचे कोरोना कालावधीतील शिक्षण | education of divyang students in Corona period
> सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्सची) घोषणा | Bridge Course announcement