दिव्यांग विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी महाकरियर पोर्टल ची मदत | How to choose career for disabled students

प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी योग्य करिअर निवडणे आवश्यक असते. जर योग्य वेळी योग्य करिअर मार्गदर्शन उपलब्ध झाले नाही. तर मग जे पुढे दिसेल त्यानुसार आपण त्या क्षेत्रात करिअर करतो. 

मुख्य म्हणजे इयत्ता 9 वी ते 12 वी या काळात जर योग्य करिअर विषयक मार्गदर्शन मिळाले. स्व ची जाणीव झाली. तर नक्कीच पुढील आयुष्यात विद्यार्थी आपल्या क्षमता ओळखून आवडीच्या क्षेत्रात करियर करू शकतील. 

maha career portal


मात्र यासाठी मुलांना योग्य वेळी शिक्षक , पालकांनी सपोर्ट करणे आवश्यक आहे. बोर्ड परीक्षा म्हणजे इयत्ता 10 वी व 12 वी नंतर विविध करियर च्या संधी कोणत्या आहेत? कोणते पर्याय उपलब्ध आहे? कोणत्या क्षेत्रात संधी आहेत? असे नाना विविध प्रश्न मुलांच्या सोबत पालकांच्या मनामध्ये येतात. 

समावेशित शिक्षण: दिव्यांग प्रेरणादायी पुस्तके | divyang motivation book

SCERT SWADHYAY 2021

दिव्यांग विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी महाकरियर पोर्टल ची मदत | How to choose career for disabled students 

विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांचे करियर निवडणे हे आव्हानात्मक परिस्थिती पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर असते. आपण महा करियर पोर्टल विषयी वाचले किंवा ऐकले असेलच Maha Career Portal मध्ये सर्वच मुलांसाठी म्हणजे इयत्ता ९ वी ते १2 वीच्या विद्यार्थ्यांना करियर निवडण्यासाठी महा करियर पोर्टल मध्ये करिअर, कोर्सेस, युनिव्हर्सिटी आणि प्रवेश परीक्षा याविषयी माहिती दिलेली आहे.


16 देशांमधील 260000 + प्रोग्रामसह 550 + करिअर आणि 21100 + कॉलेजबद्दल तुम्ही जाणून घेऊ शकता. 1150 + प्रवेश परीक्षा आणि 1120+ स्कॉलरशिपच्या संधींविषयी माहिती महा करियर पोर्टल मध्ये उपलब्ध आहे {alertInfo}


विशेष म्हणजे हे सर्व मोफत असून मराठी भाषेत उपलब्ध आहे. दिव्यांग मुलांना देखील याची मदत मिळते. ज्या वेळी आपण आपल्या आवडीनुसार कोर्सेस ची माहिती घेतो, त्याठिकाणी कोणत्या दिव्यांग प्रकारातील विद्यार्थी संबंधित कोर्स करण्यास सक्षम आहे. त्याविषयीची माहिती प्रत्येक कोर्सेस मध्ये मिळते. त्यासोबतच शिष्यवृत्ती , कॉलेज आणि अभ्यासक्रम, नोकरीच्या संधी, उत्पन्न याविषयीची माहिती उपलब्ध आहे. {alertInfo}


करियर विषयक कोर्सेस संबंधी साधारणपणे  तुम्ही काय करू शकता? , मुख्य भूमिका आणि जबाबदाऱ्या, कामा संबंधित उपक्रम, करिअर प्रवेशासाठी मार्ग, शैक्षणिक पात्रता, आवश्यक क्षमता (इंटरेस्ट), ज्ञान,व्यक्तिमत्व, उत्पन्न, नोकरीच्या संधी, करिअरमधील प्रगती, भविष्यातील संभावना, विशेष सक्षम व्यक्तींसाठी माहिती  Maha Career Portal मध्ये उपलब्द आहे.

याठिकाणी आपणास समजण्यासाठी एक उदा. देत आहे.

खालील विशेष क्षमता असलेल्या लोकांना ऑटोमोबाईल विक्री कार्यकारी म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते.

  • किरकोळ शारीरिक दिव्यांगत्व असलेली व्यक्ती
  • कुष्ठरोगातून बरी झालेली व्यक्ती
  • ॲसिड हल्ला बळी
  • अल्प दृष्टी असलेली व्यक्ती
  • अंशतः कर्णबधिर व्यक्ती
  • डिस्लेक्सिया/वाचन अक्षमता
  • कर्णबधिर व्यक्ती

अशा पद्धतीने आपण ज्या कोर्सची माहिती घेणार त्याठिकाणी खालील फोटो मध्ये डाव्या बाजूस शेवटचा मेन्यू हा विशेष सक्षम व्यक्तींसाठी च्या संबंधी माहिती दिलेली आहे. 

divyang career


महाकरियर पोर्टल कसे वापरावे? विद्यार्थी, शिक्षक किंवा पालकांनी महा करियर पोर्टल मध्ये लॉगीन कसे व्हावे? याविषयीची सविस्तर माहिती येथे वाचा..

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२१-२२

महाकरिअर पोर्टल कसे वापरावे? How to Use Maha Career Portal ? 

स्व-ची जाणीव व करिअर कसे निवडावे? 


Post a Comment (0)
Previous Post Next Post

Recent Posts

Facebook