समावेशित शिक्षण उपक्रमांर्तगत 'दिव्यांग बालकांना मदतीचा हात' पंचायत समिती राहाता शिक्षण विभागाचा नाविन्य पुर्ण उपक्रम

'समग्र शिक्षा'  समावेशित शिक्षण पंचायत समिती राहाता शिक्षण विभाग अंर्तगत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये ० ते १८ वयोगटातील २१ प्रवंर्गातील ११५० दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी अंपग समावेशित या उपक्रमातंर्गत दोन विशेष तज्ञ व ६ विशेष शिक्षक कार्यरत असून तालूक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या  सर्वागिण विकासाच्या दृष्टीने  जिल्हा  शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर,जिल्हा समन्वयक अंपग समावेशित शिक्षण अहमदनगर मा. गटशिक्षणाधिकारी  काळे साहेब याच्यां मार्गदर्शनाखाली काम करतात.

covid 19 help for divyang


दिव्यांग विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गरजा पुर्ण करणे आणि दिव्यांग विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात कसा टिकवून राहिल यासाठी सतत प्रयत्नशिल रहाणे त्याचप्रमाणे तालूक्यातील विविध प्रकारातील शस्त्रक्रिया आरोग्य विभागाशी समन्वय साधून पुर्ण करुन घेणे. यासाठी सतत प्रयत्नशिल असतात.याचाच एक भाग म्ह्णुन फैजान समिर शेख जि.प.प्रा.शाळा राहाता  हा इ.४ थी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी तोंडाच्या मांसल भागाच्या व्याधीमुळे ग्रस्त होता या विद्यार्थ्याची दि.२४/१/२०२० रोजी महांत्मा गांधी हास्पीटल मुंबई या ठिकाणी यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली ही जिल्हातील पहिली दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया  ठरली. मुलाची अर्थिक परिस्थिती नाजुक असल्यामुळे  त्या मुलाची शस्त्रक्रिया   होऊ शकत नव्हती.परतु आपल्या सर्वांच्या प्ररणेने ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे आता तो व्यवस्थित जेवण करु शकतो.

तसेच मा गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे साहेब आणि मा. गटशिक्षणाधिकारी  काळे साहेब याच्यां मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गरजा पुर्ण करण्याबरोबरच येणा-या नैसर्गिक आपत्तीमध्ये  सामाजिक बांधिलकी म्हणून वेगेवेगळे उपक्रम राबविण्याचा प्रयत्न असतो.जेणेकरुन  दिव्यांग विद्यार्थ्याच्या शिक्षणाबरोबरच  त्यांच्या जीवनावश्यक गरजा पुर्ण करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून काम करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असतो.

समावेशित शिक्षण उपक्रमांर्तगत 'दिव्यांग बालकांना मदतीचा हात' पंचायत समिती राहाता शिक्षण विभागाचा नाविन्य पुर्ण उपक्रम  

panchayat samiti rahataमार्च महिन्याच्या अखेरीस देशावरच नव्हे तर पुर्ण जगावर कोविड-१९ या विषाणू महामारीचा मोठया प्रमाणात प्रसार झाल्याने आपल्या देशात सुमारे दोन महिन्यासाठी लाकडाऊन करण्यात आले होते त्यामुळे समाजातील अनेक घटकांतील व्यक्तीवर उपासमारीची वेळ आली.त्यात दिव्यांग बालके व त्यांचे पालक हे अपवाद नव्ह्ते. बहुतेक दिव्यांग विद्यार्थ्याचे पालक रोजनदारी व अन्य मार्गाने आपली उपजिविका भागवत होते. 

लॉकडाऊन झाल्यामुळे त्याच्यां हाताला काम न मिळाल्यामुळे त्यांच्या वर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी म्ह्णून पंचायत समिती राहात्याचे गटविकास अधिकारी मा.समर्थ शेवाळे यांच्या पुढाकाराने त्यांचा COEP (अभियांत्रिकी) महाविद्यालयाच्या मित्र परिवाराच्या मदतीने व सामाजिक संघटना  मानवता फाऊंडेशन सावळीविहीर यांच्या तर्फे राहाता तालुक्यातील अर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या २४५ दिव्यांग  विद्यार्थ्यांच्या पालकांना सामाजिक अंतराचा नियम पाळून वस्तुचे  एक महिना  पुरेल एवढे साहित्य  देण्याचा मानस व्यक्त केला असता .मा .गटशिक्षणाधिकारी काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली २४५ विद्यार्थ्यांना  विशेष तज्ञ व विशेष शिक्षक  याच्यां  मदतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना  ते  घरपोहच करण्यात आले. जीवनावश्यक वस्तू बरोबरच कोविड -१९ विषयी विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये  जनजागृती करण्यात आली.

१)मास्कचा वापर करा.
२)शिंकताना रुमालाचा वापर करा.
३) वांरवार हात साबनाने धुवावेत.
४)आपल्या घरीच रहा बाहेर पडू नका.
५) सर्वांबरोबर सुरक्षित अंतर ठेवा.
६)हस्तांदोलन करु नका.
७)ताप खोकला व सर्दिसाठी डाक्टराचा सल्ला घ्या.

Helping hand for disabled children on covid19


अशा प्रकारची स्व;ताच्या सुरक्षेबाबतची माहिती पालकांना देण्यात आली.शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक प्रयत्न या संस्थाच्या वतीने करण्यात आला.त्याच प्रमाणे राहाता तालूक्याचे गटविकास अधिकारी मा.समर्थ शेवाळे साहेब यांच्या प्रयत्नातून राहता तालुक्यातील दिव्यांग व अनाथ असलेल्या २१ विद्यार्थांना त्यांच्या पुढ़ील शिक्षणासाठी अमेरीकेतील एका सामाजिक संस्थेला दत्तक देण्याचे प्रस्तावित आहेत.1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post

Recent Posts

Facebook