अध्ययन शैली नुसार सूक्ष्म अध्यापन कौशल्य I Learning Style

 अध्ययन शैली नुसार सूक्ष्म अध्यापन कौशल्य I Learning Style


five sense

शिक्षकांच्या शैक्षणिक कार्यातून, अनुभवातून, विषयाची समज विकसित होतेअर्थातच आपल्या अध्यापन शास्त्राच्या ज्ञानात त्याची भर  पडते. त्यातून विद्यार्थ्यांच्या शिकण्याची शैली माहिती होते. विद्यार्थ्यांना समजेल, रुचेल. आनंददायी  वाटेल, त्यांना हसत-खेळत ज्ञान मिळेल. असा कायमचं शिक्षकांचा प्रयत्न असावा.


संपूर्ण सेशन 

 

सत्राची  ची सुरुवात - श्रीम. शीतल भिसे मॅडम

प्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन आजच्या सत्राला सुरुवात केली. त्यांनी फेसबुक लाईव्ह पेजच्या चौथ्या सत्रात महाराष्ट्र समावेशित शिक्षण व्यावसायिक संघाच्या वतीने सर्वांच स्वागत  केले. समावेशित शिक्षणामध्ये कार्यरत सर्व व्यावसायिकांच्या सक्षमीकरणाचे, आपले ज्ञान अद्ययावत करण्याचे, या क्षेत्रात काम करत असताना येणाऱ्या आव्हानांवर चर्चा करून त्यावर मात करता यावे यासाठी एक संघ होणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या आधीच असे जोडले गेलो होतो तसेच चौथ्या सत्रात पुन्हा आपल्या भेटीला आम्ही आलेलो आहोत. आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी अध्यायन शैलीनुसार सूक्ष्म अध्यापन कौशल्य या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी, आपल्याशी संवाद साधण्यासाठी, आपल्याला श्री तुळजाभवानी जुनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद येथून आ.श्री प्राध्यापक विवेक कोरे सर जोडले गेले आहेत. मी आमचे वरिष्ठ सहकारी श्री. सतीश भापकर सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या प्रमुख व्याख्याते यांचा परिचय करून द्यावा.

समावेशित शिक्षण: दिव्यांग प्रेरणादायी पुस्तके | divyang motivation book

परिचय सत्र - श्री सतीश भापकर सर

गुरुपौर्णिमेच्या सर्व राज्यातील गुरुजनांना MAIEP मनःपूर्वक शुभेच्छा देऊन आपला परिचय सत्राला सुरुवात केली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः आपल्या आयुष्यामध्ये गुरुंचे स्थान अत्यंत महत्त्वाचं असतं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला ज्ञान प्राप्त होत असतं. आणि आजच्या दिवशी आपण गुरूंना वंदन करून ते ऋण व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो.

     समावेशित शिक्षणाच्या सक्षमीकरणासाठी एक पाऊल हे ब्रीदवाक्य घेऊन MAIEP हा एक संघ काम करत आहे.

महिनाभरापासून हा संघ आपल्यासाठी वेगळा विषय घेऊन येत आहे. MAIEP हे एक माध्यम असून, आपल्या समोरच ज्ञानाचे भांडार खुले  करण्याचं काम या संघाच्या वतीने करण्यात येत आहे. या संघामध्ये समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत कार्यरत असणारे सर्वात पदे असे जिल्हा समन्वयक, विशेषज्ञ, विशेष शिक्षक या सर्व व्यावसायिकांचा स्वागत करण्यात आलेया सर्व व्यावसायिकांचे सक्षमीकरण करण्यासाठी हा संघ निरंतर काम करणार आहे. आजच्या दिवशी अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आपल्या समोर आलो आहोत.

विषय - अध्ययन शैली नुसार सूक्ष्म अध्यापन कौशल्य यापूर्वी आपण डीएड, बीएड करत असताना, सूक्ष्म अध्यापन हा विषय शिकलेलो आहोत, शिक्षकांसाठी हा अत्यंत महत्वाचा असा घटक आहेअध्याय शैली आणि सूक्ष्म अध्यापन याचं लिंक आपल्याला आजच्या व्याख्यानात करून देण्यात येणार आहे.

आजचे व्याख्याते आहेत मा. विवेक कोरे सर, 17 वर्षापासून श्री तुळजाभवानी जुनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद येथ आपले सेवा देत आहेत. सर एक उत्तम वक्ते आहेत. शैक्षणिक विषयावर गाणे लेखन करतात,  गाणे गातात. असे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्या समोर हा विषय मांडणार आहेत. सर समावेशित शिक्षणासाठी नवीन नाहीत ते राज्यस्तरावर पाच दिवशीय शिक्षक प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी सुलभक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.  सरांचे मी या सत्रात स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सत्राला सुरुवात करावी, असे मत व्यक्त केले.


व्याख्याते - मा. श्री. विवेक कोरे सर

आज गुरुपौर्णिमा, खूप सुंदर योग आजच्या दिवशी आला आहे. जे जे गुरुजन कार्यरत आहे त्यांचं अविरत कार्य सुरू आहे, त्या सर्व गुरुजनांना माझा नमस्कार. खरं तर या समावेशित शिक्षणात प्रशिक्षणामध्ये ज्या व्यक्तीने मला समाविष्ट केलंते आ. श्री अजय काकडे सर, डॉ. कलीम जी शेख सर यांचे सुरुवातीलाच धन्यवाद मानलेसमावेशित शिक्षण मध्ये काम करणाऱ्या सर्व व्यावसायिकांचे सक्षमीकरण करण्याचा हा उद्देश आहे. 21 प्रकारच्या दिव्यांग बालकांची  चार मध्ये विभागणी केलेली आहे. त्या शैली खालील प्रमाणे.

  1.  दृश्य अध्यायन शैली
  2.  श्रवण अध्यायन  शैली
  3.  स्पर्श अध्यायन  शैली
  4.  बहू अध्यायन  शैली

 

1.दृश्य अध्यायन शैली

या विद्यार्थ्यांची शिकण्याची पद्धत, चित्रेअक्षरे, शब्द, अंक.मोबाईलसंगणक, या माध्यमांद्वारे शिकणारे. शिक्षकांचे सादरीकरण आणि प्रभावी अध्यापन खूप गरजेचे आहे.

 2. श्रवण अध्यायन  शैली

 हे विद्यार्थी श्राव्य अध्ययन शैली विद्यार्थी असतात हे कशा पद्धतीने शकतात. हे कशा पद्धतीने अध्ययन अनुभव घेतात., मोबाईल कॉम्प्युटर, रेडिओ. सुस्पष्ट आवाजाने यांच्या पर्यंत अध्ययन अनुभव पोहचले पाहिजे.

3. स्पर्श अध्यायन  शैली

जे  विद्यार्थी स्पर्शाच्या साह्याने अध्ययन अनुभव घेतात., विविधांगी अंगाने अनुभव देऊन त्यांना अध्ययन-अध्यापन करावे  लागते.

4. बहूअध्यायन  शैली

हे विद्यार्थी एकापेक्षा जास्त संवेदना  वापरू शिकतात. आपल्याकडचे जास्तीत जास्त कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीकोनातून आपण शिक्षकांनी नेहमी प्रयत्नशील राहायला हवं. याच दृष्टिकोनातून हा विषय आपल्या पुढे घेऊन येण्याचा  उद्देश आहे.

  1. सूक्ष्म अध्यापनाची गरज काय? सूक्ष्म अध्यापन कशासाठी? त्याची आवश्यकता का?
  2. समावेशित शिक्षणाकडून शिक्षणाकडे हा प्रवास सुखकर होण्यासाठी
  3.  अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक परिणामकारक होण्यासाठी.
  4.  सर्व अध्यायन  येणार त्यांना प्रवाहात आणण्यासाठी.
  5.  अध्ययन अडथळे दूर करून मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी.

 वरील सर्व बाबींसाठी स्वतःच्या अध्यापन कौशल्ययातील त्रुटी दूर व्हाव्यात तसेच शाब्दिक अध्यापन कौशल्या इतकीच अशाब्दिक  अध्यापन कौशल्ये विकसित व्हावी यासाठी सूक्ष्म कौशल्यांचा सराव अपेक्षित आहे.

हे सर्व करत असताना समावेशित शिक्षण कशा पद्धतीने करायला पाहिजे?

  1.  सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करणे.
  2.  विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरण निर्माण करून देणे.
  3.  त्यांना सहयोग करा.
  4.  उद्दिष्ट साध्य करणे

ज्ञानरचनावादा नुसार 5 E

Engage - गुंतवणे

Exploer - शोध घेणे

Explain  -  आशय स्पष्ट करणे

Elaborate - तपशीलवार माहिती देणे.

Evaluation-ताणरहित मूल्यमापन

Micro Teaching - सूक्ष्म अध्यापन

विशिष्ट अध्यापन वर्तनावर लक्ष केंद्रित करून नियंत्रित वातावरणात केलेला अध्यापन सराव म्हणजे सूक्ष्म अध्यापन होय

  सायकल द्वारे विस्तृत उदाहरण  देऊन  सदर घटक अधिक  स्पष्ट करण्यात आला.

  1. Micro Teaching - सूक्ष्म अध्यापन.
  2. Teaching. शिकविणे
  3. Discussion - चर्चा
  4. Feedback - अभिप्राय
  5. Reteach -
  6. Discussion - चर्चा
  7. Feedback - अभिप्राय
  8.  MicroTeaching skills
  9. Introduction  - सज्जता प्रवर्तन
  10. Stimulus Variation - चेतक  बदल
  11. Reinforcement - प्रबलन
  12. Using of  Teaching Aids - साधनांचा  वापर
  13. Introduction  - सज्जता प्रवर्तन

1 लक्षवेध प्रारंभ/ प्रेरणा निर्मिती

 2.अवधान केंद्रीकरण

3. जिज्ञासा निर्मिती

4. पूर्वज्ञान जागृती 

5. सुसपष्ट हेतू कथन

6. अचूक शीर्षक लेखन.

  वरील सर्व मुद्द्यांचा अतिशय विस्तृत सुस्पष्ट, अगदी सर्वांना समजेल असे विविध उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केले.

Stimulus Variation - चेतक  बदल

  1. शिक्षकांची हालचाल
  2. शिक्षकांचे हावभाव
  3. बोलण्याच्या पद्धतीतील बदल
  4. संवेदन लक्षात बदल
  5. विद्यार्थ्यांचा हावभाव

चेतक बदल हे सर्व कौशल्यांमध्ये अत्यंत महत्त्वाचे असे कौशल्य आहे. शिक्षकाला अभिरोपण करावे लागते. अभिनेता अभिनय करतो पण शिक्षक अभिरोपण करतो. विद्यार्थ्यांना नाही कळल्यावर त्याला त्याच्या अध्ययन अनुभवाची पुनरावृत्ती करावी लागते. वरील प्रत्येक मुद्द्यावर आधारित विविध अनुभव देऊन सविस्तर विश्लेषण श्री विवेक कोरे सरांनी केले.

Reinforcement - प्रबलन

  1.  स्वीकृती
  2.  शाब्दिक प्रशसा
  3.  अशाब्दिक प्रशंसा
  4.  व्यक्तिवाचक उल्लेख
  5.  आधारात्मक नकार
  6.  इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन

विद्यार्थ्यांचे योग्य वेळी योग्य शब्दात कौतुक करणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील चांगली कृती करण्याकरिता प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांचा पहिले स्वीकार करा. विद्यार्थी आपल्याकडे आकर्षित करावा हा शिक्षकांचा पहिला प्रयत्न असावा. कौतुकाची थाप पडली म्हणजे विद्यार्थी शिक्षकांच्या आपोआपच जवळ येण्याचा प्रयत्न करतो आणि मग जो संवाद घडून येतो तो सुसंवादाकडे वाटचाल  करतो. ही  शिक्षक विद्यार्थ्यांमधील महत्त्वाची प्रक्रिया आहे.

Using of  Teaching Aids - दृकश्राव्य साधनांचा  वापर

 शैक्षणिक साधना  शिवाय, आधार प्रणाली शिवाय,  कोणताही पाठ प्रभावी होत नाही.

  1.   योग्य साधनांची निवड
  2.  साधनांची  पर्याप्तता
  3.  साधने वापरण्याची पूर्वतयारी
  4.  साधनांची  अनुरूपता
  5.  साधनांचे सादरीकरण व सहजता
  6.  विद्यार्थ्यांचा सहभाग

 या सर्व मुद्द्यांना स्पष्ट करताना, सरांनी शैक्षणिक साधने अध्यायन  शैलीनुसार तयार केले होते आणि त्या माध्यमातून वरील प्रत्येक मुद्द्यांचे  विश्लेषण करून सर्वांना समजेल असं प्रभावी पद्धतीने मुद्यांची मांडणी केली. सूक्ष्म अध्ययन म्हणजे काय हे फक्त सांगितले नाही तर स्वतः प्रत्येक मुद्द्यांचा सादरीकरण करताना पूर्ण तयारी कोरे सरांनी केलेली होती. विद्यार्थ्यांना कल्पना करण्यासाठी उद्युक्त करावे.

Imagination is more important than knowledge.

Knowledge is limited imagination encircles the  world.

 विद्यार्थ्यांनां  कल्पनेचा व्यवस्थित विस्तार कसा करावा हे शिक्षकांनी शिकवायला हवे. यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. विद्यार्थ्यांना घटकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शिक्षकांनी करायला हवासमावेशित शिक्षणावर आधारित सरांनी स्वतः रचलेले गीत आहे. या गीताचा सादरीकरण देखील सरांनी या सत्रात करण्यात आले.

प्रश्नोत्तराचे सत्रश्री  सतिश भापकर

हे सत्र अतिशय प्रभावी झाले प्रत्येक मुद्दा इतका सुंदर रीतीने मांडला की यावर प्रश्न नाहीतर सकारात्मक  प्रतिक्रिया प्राप्त झालेले आहेतकविता शर्मा मॅडम यांनी   सरांच स्वयंम रचित गीत  ऐकण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

युगंधरा ताजवे मॅडम  - शैक्षणिक साहित्याचा उत्तम वापर करून सूक्ष्म अध्यापन कौशल्याचा सादरीकरण सरांनी केले आहे.

धनश्री गाढी मॅडम - अध्यायन  शैलीनुसार सुयोग्य उदाहरणांचा अध्याय साहित्याचा उल्लेख केला आहे.

 सावी  गायकवाड मॅडम -आपले हे सेशन युट्युब वर उपलब्ध झाल्यास, शाळेच्या व्हॉट्सऍप ग्रुप ला सेंड करणे सोयीचे होईल अशी मागणीही प्राप्त झाली आहे.

श्री गणेश वेदपाठक सर  - सर्व अध्ययन शैली च्या मुलांना सूक्ष्म अध्यापन, त्याचे महत्त्व खूप छान  स्पष्टीकरण, उदाहरणे पण खूप छान ऐकून खूपच छान वाटले.

आपण सर्वजण विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी आहोत. कोणता विद्यार्थी कोणत्या अध्यायन  शैलीने शिकतो हे लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. विविधांगी कौशल्य वापरून शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी सदैव तत्पर असणे आवश्यक आहे. म्हणजे आहे त्या शैक्षणिक प्रगतीमध्ये आपण सुधारणा करू शकतो. पण प्रामाणिक प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे.

समावेशित शिक्षणाचे  गीत

 चला जाऊया सुलभ शिक्षणाकडे

चला जाऊया सुलभ शिक्षणाकडे

नाचू गाऊनी देऊ आनंदी धडे II

 

AL शी छान मैत्री करूया

सुस्पष्ट सुरात मस्त बोलुया

नाचू गाऊनी देऊ आनंदी धडे II

 

VL ला आकर्षक चित्रे दाखवूया

आशययुक्त हावभाव करूया

नाचू गाऊनी देऊ सुंदर धडे II

 

ML साठीचे नियोजन करूया

विविध शैलीने त्याला बोलुया

नाचू गाऊनी देऊ सुंदर धडे II

 

सर्वांना प्रेमाने सामावून घेऊया

अध्यययनासाठी प्रेरणा देऊया

वाटचाल करूया प्रगतीकडे

चला जाऊया सुलभ शिक्षणाकडे..

 

गीतरचना -प्रा विवेक कोरे


विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून आपल्याला आपल्या अध्यापनामध्ये बदल करता येतात, त्यामुळे शिक्षकाला विद्यार्थ्यांचे चेहरे वाचता आले पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे आपण सर्वांनी मला व्यवस्थित रित्या ऐकून घेतल्याबद्दल, आणि प्रचंड प्रेरणा दिल्याबद्दल आज गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व गुरुजनांचे सर्व ऐकणा -या सन्माननीय मान्यवरांचे मी आभार मानतो असे मत व्यक्त करून सरांनी आपल्या संवादाचे सांगता केली.

आभार सत्र  - शितल भिसे मॅडम

  आपले आदरणीय कोरे सर जेव्हा आपल्याशी व्याख्या संवाद साधत असतात. ती व्याख्यान  नसते तो संवादच असतो. यामध्ये आपण पूर्णपणे मंत्र मुक्त झालेला असतो. त्यांच्या आवाजामध्ये त्यांच्या हा भावामध्ये, चेतक बदल सरांनी स्पष्टीकरण करून सांगितले ते अगदी त्यांच्यातच असतात. आणि आपल्याला ते काही वेगळा शिकण्याची गरज नाही. कोरे सरांच व्याख्यान गुरुपौर्णिमेनिमित्त निमित्त आपल्याला मिळालेली पर्वणी होती. संपूर्ण संघातर्फे तसेच आज उपस्थित असलेल्या सर्व व्यावसायिकांत तर्फे मी श्री विवेक कोरे सर यांचे खूप खूप आभार मानते. सरांनी सांगितलेला एकेक शब्द अगदी कानात साठवून ठेवावा असा होता. हा एकही शब्द कोणाकडूनही ऐकायांचा राहून जाऊ नये यासाठी महाराष्ट्र समावेशीत शिक्षण व्यावसायिक संघाने पूर्ण काळजी घेतली आहे.  व्याख्यान तुम्ही पुन्हा ऐककू शकता हा संवाद तुम्ही पुन्हा स्मरण करू शकता. यासाठी संघाने हे व्याख्यान युट्युब वर उपलब्ध करून दिले आहे कृपया सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा हि नम्र विनंती करून शितल मॅडम यांनी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानलेधन्यवाद.


Post a Comment (0)
Previous Post Next Post

Recent Posts

Facebook