कोरोना कालावधितील समावेशित शिक्षण I Inclusive Education

 कोरोना  कालावधितील समावेशित शिक्षण I Inclusive Education

covid19

विद्यार्थ्यांचं निरंतर शिक्षण सुरू राहण्यासाठी आपण शिक्षक म्हणून नेहमीच शिक्षण कार्यात स्वतः सक्रिय सहभाग घेणं आवश्यक आहेतरच मूल शिकेल आणि टिकेलनवनवीन शैक्षणिक पर्यायाची निर्मिती करणे हा आपल्या शैक्षणिक अनुभवातील एक भाग सदैव असला पाहिजे.

प्रस्तावना   उद्दिष्टे - श्री.  विकास  चव्हाण.

       महाराष्ट्र समावेशित शिक्षण व्यवसायिक संघाच्या वतीने  प्रथम सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आलेत्याचबरोबरसोशल मीडियाशी  जोडलेल्या सर्वांचे  स्वागत करण्यात  आले.

●    उद्देश्य -

1)  महाराष्ट्र समावेशित शिक्षण व्यवसायिक  संघाच्या वतीने समावेशासाठी कार्यरत असणाऱ्या सर्व व्यवसायिकांचे सक्षमीकरण करणे ज्ञानामध्ये अद्ययावतता आणणे.

2)  एकसंपणे एकमेकांच्या जवळ येऊन आपल्या  कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या आव्हानावर चर्चा करणे,  या उदात्त हेतूने आपण महाराष्ट्र समावेशित शिक्षण व्यवसायिक संघाच्या मंचावर नेहमी त्यानंतरही घेणार आहोत.

 आजच्या नियोजित सत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण विषय आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहोत.  

विषय - कोरोना कालावधीतील समावेशित शिक्षण

 रत्नप्रभा  भालेराव मॅडम नाशिकहून आपल्याबरोबर आहेतत्यांच्या  परिचय  करून  देण्यासाठी विजया अवचार मॅडम विनंती विनंती  करण्यात आली.

व्याख्यात्यांचा परिचय - श्रीमविजया अवचार.

यांनी सर्वांचे स्वागत करून परिचय सत्राला सुरुवात केलीमहाराष्ट्र समावेशक शिक्षण व्यवसायिक संघाच्यावतीने 30/6/2020 रोजी फेसबुक  live  पेजवर सर्वांचे  मनःपूर्वक  स्वागत  केले.

      समावेशित शिक्षण व्यावसायिक संघाचा महत्वाचा उद्देशसमावेशित शिक्षणाचे सक्षमीकरण यासाठी  सहाय्य करणेसमावेशित शिक्षण व्यावसायिक तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचे बळकटीकरण करणेशिक्षणक्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीशैक्षणिक विकासासाठी कार्य करणेआज आपल्याबरोबर महाराष्ट्र समावेशीत शिक्षण व्यवसायिक संघाच्यावतीने लाईव्ह फेसबुक पेजवरकोरोना कालावधितील समावेशि शिक्षण या विषयावर संवाद साधण्यासाठीआदरणीय श्रीमती रत्नप्रभा भालेराव मॅडम उपस्थित झालेल्या आहेतडायट नाशिक येथे ज्येष्ठ अधिव्याख्यातातसेच समता विभागाच्या प्रमुख म्हणून काम बघत आहेत त्याचबरोबर SCERT  मार्फत आयोजित विविध प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणाचे मोड्युल  तयार करण्यासाठी सहभागी आहेत  तसेच राज्यस्तरावर तज्ञ मार्गदर्शक वेळोवेळी काम बघत आहेतविशेष म्हणजे त्या राज्यस्तरावर समावेशित शिक्षणाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून देखील काम करत आहेतअसे बहुआयामी व्यक्तिमत्व .श्रीमरत्नप्रभा भालेराव मॅडम यांना आपला संवाद सुरू करण्याबाबत विनंती करण्यात आली.

●    प्रमुख  व्याख्याते - मा.  श्रीमरत्नप्रभा भालेराव मॅडमज्येष्ठ अधिव्याख्याता,  डायट नाशिक.

      माश्रीमरत्नप्रभा भालेराव मॅडम यांनी सर्वाना  नमस्कारत्यांनी  आपल्या  चर्चा सत्राला सुरुवात करण्यापूर्वीमहाराष्ट्र समावेशि शिक्षण व्यावसायिक संघाचे अभिनंदन केलेऑनलाइन एज्युकेशन सुरुवात झालेली आहे तेव्हापासून प्रत्येक जण आपापल्या व्यवसाय समृद्धीसाठी कोणती ना कोणती गोष्ट पुढे नेण्यासाठी एकत्र येत आहेत ऑनलाईन, zoom,व्हाट्सअप ग्रुप, twiter, असतील किंवा फेसबुक लाईव्ह किंवा  काही पेजेस  असतील तर हे तयार करण्याचे काम मागील तीन महिन्यापासून चालू झालेले  होतेपरंतु थोडी खंत वाटत होतीकी आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत यात समावेशित शिक्षणाबाबत मध्ये आपण कुठे मागे तर  राहत नाही आहोत ना?  आणि ती खंत निश्चितएका चांगल्या विचारामध्ये बदलण्याचे  काम  महाराष्ट्र समावेश शिक्षण व्यवसाय संघ यांनी तयार केलेला आहेआणि त्याच्या पाठीमागे जे आपले सगळेच सहभागी झालेला होता आणि आपण  वेगळी दिशा घेऊन सहभागी झाललो आहोत,  या तीन  सत्रामध्ये  असं  जाणवते आहे आपणही कुठे मागे नाही आहोत त्यामुळे संघाच्या  या निर्मितीमध्ये आणि विशेषतऑनलाइन आणि फेसबुक चळवळीमध्ये  मध्ये येण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत या सगळ्यांचा एकदा अभिनंदन करतेसगळ्यांना शुभेच्छा देतेआणि आज ही जी चर्चा करत  आहोत त्या चर्चे मध्ये सहभागी असणारे सगळे महाराष्ट्र मध्ये समावेशित शिक्षणामध्ये कार्यरत असणारे माझे सहकारी आहेतत्याचबरोबर सर्वं  स्रोत  व्यक्ती आहेत या मध्ये महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कडून माअजयजी काकडे सर यांचे  नेहमीच आपल्याला सहकार्य असते ते आहेतजिल्हा समन्वयक सगळे आज इथे  जॉईन  आहेत त्या सर्वांचा मी स्वागत करते तसेच सांगण्याची संधी उपलब्ध करून दिले त्याबद्दल सुरुवातीलाच त्यांचे आभार मानते.  असे  मत  व्यक्त करून आपल्या विषयाला सुरुवात केली.

  त्यांच्या व्याख्यानात आलेले महत्त्वाचे होते खालील प्रमाणे.

1) कोरोना कालावधीत समावेशित शिक्षण हा  विचार  का  पुढे आला.

●     या माहामारी मुळे माणूस घाबरून गेला.

● सर्व शाळेचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले समावेशित शिक्षणाच्या कामकाजाविषयी कायअसे प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली?   शिक्षणाचे काम ऑनलाईन पद्धतीने सुरू होताना आपण कुठे मागे पडत आहोत काहे मानसिक भूमिका समावेशित शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांची निर्माण झाली,  त्यामुळे ह्या विषयातील पहिला मुद्दा आहे. 1) Physical Distance शारीरिक अंतर.,

 2) Social  Distance सामाजिक अंतर,

3) Learn  from  home घरी  राहून   शिक्षण.

  वरील तीनही संकल्पना समावेशित शिक्षणासाठी नवीन आहेत का?  हा प्रश्न त्यांनी समावेशी शिक्षणामध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांना केला

 हे शब्द मोठ्या प्रमाणात ग्लोबली वापरले गेले नाहीतपण ते आता कोरोनामुळे  ग्लोबल  झाले आहेतपरंतु हे शब्द समावेशीत शिक्षणया शब्द कोशामध्ये सुरुवातीपासूनच आलेले आहेतकारण युगाने  युगे  किंवा  हजारो  वर्षापासून म्हणा ही जी समावेशित शिक्षणाची जेव्हा  ती  Inclugive  मध्ये  नव्हती  पण  ती  excludive या step मध्ये होती ही

शिक्षण प्रणाली तेव्हापासून शारीरिक अंतर हे होतंच म्हणजे समाजाने कधीही दिव्यांगांना ,  फार मोठ्या प्रमाणामध्ये समावून घेतलं असं कधीच दिसलं नाही इतिहासामध्ये जरी  आपण गेलो  तरी नाही आणि वर्तमान यामध्ये सुद्धा नाही.आताशी सुरुवात झालेली आहेत्यामुळे भविष्यकाळाचा थोडासा विचार करायला काहीच हरकत नाही


Social distance  याचा  जर  अर्थ आपण  पहिला तर असा एक गट की  ज्याला थोड्या अंतरावर ठेवल जातेआणि हे अंतर कशासाठी?  या कोविड च्या  काळामध्ये सोशल distance  चा अर्थ असा आहे कीआरोग्याच्या संदर्भाने  आलेली आत्ताची परिस्थिती आहेत्या परिस्थितीला हाताळण्यासाठी कोविड -19 बरोबर  लढण्यासाठी असा जो ग्रुप आहेअशा लोकांना एका वेगळ्या सिस्टम मध्ये ठेवणे त्यांना उपचार करणेजनसामान्यात पासून विलग  करणेत्यांच्यावर उपचार करणे आणि पुन्हा त्यांचे सामाजिकीकरण करणेअशा अर्थाने हा सोशल डिस्टन्स  हा  शब्द आला आहे.

      यामध्ये समावेशित शिक्षणाची जी व्यवस्था आहेती कुठे बसते याबाबतचा विचार आपल्याला करावा लागणार आहेहे सामाजिक अंतर दूर करण्यासाठी आपल्यापैकी बऱ्याच जणांना याविषयी मोठे योगदान द्यावे लागलेले आहेत्यामुळे सामाजिक अंतर हा शब्द समावेशित शिक्षणात नवीन नाही.

 

1)  शारीरिक अंतर  -

कोविड -19 च्या काळात एका व्यक्तीपासून दुसर्या व्यक्तीला याचे बाधा निर्माण होऊ नये म्हणून ठेवलेले अंतर,

 समावेश शिक्षणामध्ये शारीरिक अंतर देखील आहेचकारण प्रत्येक  विध्यार्थी हा वेगळ्या अध्ययन शैली आहे प्रत्येक विद्यार्थ्यांची शिकण्याची शैली वेगवेगळी आहे हे  Total learning style  पासून वेगळे आहे आणि ते आपण सगळ्यांनी मानसिक दृष्ट्या देखील स्वीकारलेलं आहेते आपल्याला आव्हानात्मक असलं तरीदेखील आपण त्यावर काम करत असतो आणि पुढे जात असतोम्हणजे शारीरिक आंतर हादेखील शब्द आपल्याला नवीन नाहीसमावेशित शिक्षणाची वाटचाल आहे ती  Social distance    physical distance पासून सुरू झालेली आहेआणि म्हणूनच आता आपण समावेशही या संकल्पने पर्यंत येऊन पोहोचलेलो आहोतमानसिक दृष्ट्या

आणि वैचारिक दृष्ट्या ही चळवळ खूप मोठी समृद्धी आहेही स्वतःमध्ये निर्माण केलेली एक चळवळ आहे.

 

2) Learn from Home -

 सर्वसामान्यांसाठी हा परवलीचा शब्द झाला आहे. Learn from home  ही  संकल्पना समावेशीत शिक्षणासाठी कधीही नवीन नव्हती.  Learn from home ही  संकल्पना आताही स्वतःमध्ये अवलंबिली आहेतसेच ते बऱ्याच वर्षापासून आपण समावेशित शिक्षणामध्ये अवलंबतो आहोतआपल्याकडे होम बेस  मार्गदर्शनाचे विद्यार्थी असतीलकेव्हा वेगवेगळ्या अध्यायन  शैलीचे विद्यार्थी असतीलया विद्यार्थ्यांसाठी आपण learn from home  ही संकल्पना वापरत होतोचआता ती फक्त सार्वजनिक झाली आहेत्यातील ही संकल्पना आपल्यासाठी नवीन नसल्यामुळे या कोरोना  कालावधीमध्ये आपण ती  चांगल्या पद्धतीने वापरू शकतो.

●    कोरोना कालावधीत  घ्यावयाची  विशेष  काळजी.

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संदर्भात शारीरिक कमकुवतपणा त्यासाठी घ्यावयाची विशेष काळजी.

1.   प्रतिकारक्षमता वाढवणे.

2.   वैयक्तिक स्वच्छता

3.   सकस आहार  आरोग्य विषयक सवयीचा सवयींचा अंगीकार.

●     सर्वच विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणासाठीचे पर्याय.

 ●     टेलिव्हिजन

●     रेडिओ

●     व्हिडिओयुट्युब

●     दीक्षा 

●     स्मार्टफोन

●    प्रिंट मीडिया

Focus point

 

1.  नवीन प्रवेशित होणारी मुले.

2.   अतितीव्र दिव्यांग

3.   शाळेत दाखल असलेली मुले.

 या सर्वांवर काम करत असताना आपण कोणा कोणाची मदत घेऊ शकतो जेणेकरून आपलं काम अधिक सुलभ पद्धतीने करणे सोयीचे होईल.

      ●     स्रोत व्यक्तीसाधन व्यक्ती

●     शिक्षक / मुख्याध्यापक

●     पालक /मोठी भावंडे

●    व्यवस्थापक अंगणवाडी ताईग्रामस्थ,  आरोग्य सेवा,  थेरपी सेंटर.

 साधनव्यक्ती म्हणून माझ्याकडे कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी असणे आवश्यक आहे.

●    Home  schooling आराखडा,

●    Home थेरपीयूटीक Support

●    Support to Teacher ( शिक्षक सुलभन )

●     अनुकूलित नमुना पाठ / सरावा पाठ पुस्तिका तयार करणे.

●     विविध अध्ययन शैली साठी प्रश्नपत्रिका संच तयार करणे.

●     केंद्रबीटतालुका कृती नियोजन

●     शैक्षणिक साहित्य  इतर निर्मिती.

 

    या मुद्द्यांच्या आधारावर आपल्याला अजून काय करता येईलप्रशिक्षणासाठी आपल्याला भक्कम अस शैक्षणिक कामकाज कसा करता येईल या संघाच्या व्यासपीठावरून आपल्याला महाराष्ट्रातील सर्व व्यावसायिकांपर्यंत हे विचार कसे पोहोचवता येतील यासाठी आपला सातत्याने प्रयत्न असणार आहेसर्व चर्चा सत्र  मधून महाराष्ट्रासाठी एक कृती आराखडा समावेशित शिक्षणासाठी करण्याची आपल्या सर्वांना संधी प्राप्त झालेली आहेत्याचा वापर आपल्या सर्वांना करता येईल का याचा एक आपण विचार करूयाएक महत्वाचा म्हणजे या कोविड च्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू राहणे हे महत्त्वाचे आहेविद्यार्थ्यांच्या गरजेनुसार स्वतः चे  व्हिडिओ तयार करणे आवश्यक आहे आणि ते  विद्यार्थ्यांपर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पोहोचवणे हे या कालावधीमध्ये खूप महत्त्वाचं आहे.

       थेरपी बाबतपालकांना मार्गदर्शन करणे त्या अनुषंगाने व्हिडिओ तयार करावे. Home scholling  मध्ये तंत्र स्न्हेही  लोकांच्या मदतीने अध्ययन शैली नुसार निर्मिती करणेशैक्षणिक साहित्य चा सपोर्ट  वर्ग शिक्षकांना देत आला पाहिजेवरील सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने प्रभावीपणे काम करणे हे आजच्या काळाची गरज आहेकरून मुलं शकते राहिले पाहिजेकेंद्र कार्य नियोजन  शाळेच्या कार्य नियोजन प्रत्येकाने करणे आता आवश्यक आहे. 34% मुलांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचले  आहे इतर मुलांसाठी आपल्याला पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी लागणार आहेज्या ठिकाणी इंटरनेटची  सुविधा  नाहीअश्या  ठिकाणी आपल्याला त्या गावातील मोठ्या विद्यार्थ्यांची काही मदत घेता येईल कायाचाही विचार करणे आवश्यक आहेया कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पालकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहेआता आपण सर्वजण समावेशनाच्या पायरीवर आहोतया  cwsn विध्यार्थांसाठी वेगळा अभ्यासक्रम कुठे आहेतसा वेगळा अभ्यासक्रम आपण वापरत पण नाहीमात्र आहे त्या अभ्यासक्रमामध्ये  वेगळे तंत्र पद्धती विकसित करून या विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार तो त्यांच्या पर्यंत पोहोचवावा लागेलयाबाबत वर्ग शिक्षकांमध्ये जागृती  आणावी लागेल.

     2016 च्या कायद्यानुसार त्या विद्यार्थ्यांना देखील सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे शिकवायचं आहेमात्र त्यांच्या शिकण्याला लागणारा वेळत्यांच्यामध्ये असलेली क्षमतात्याचा विचार करून विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये समाविष्ट करायचं आहेअसे  मत  भालेराव  मॅडम यांनी  व्यक्त केले    प्रश्नोत्तराच्या सत्राला सुरुवात करण्याबाबत सूचित केले

●              माअजय काकडे  सर,  यांनी सुचविलेल्या नुसार आपल्या केंद्रात ऑनलाईन प्रशिक्षणाचा आयोजन  शिक्षक,  पालकांसाठी करता येईलअशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहेआभार

श्रीविकास  चव्हाण.

 भालेराव मॅडम त्यांच्या  समावेशित शिक्षणाविषयीचा मार्गदर्शन म्हणजे ऐकतच राहावं असं  वाटतेभालेराव मॅडम यांच्या  बोलण्यामध्ये सर्व शैलीचा समावेशविशेष शिक्षक,  साधन व्यक्ती यांनी द्यावा वर्ग शिक्षकांना   पालकांना द्या करावयाचा सपोर्टविद्यार्थ्यांना लागणारी थेरपीवर्गमित्र विषय मित्र गावातील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांकडून घ्यावयाची मदत या सर्व विषयावर विस्तृत  सविस्तर माहिती सांगितली त्याबद्दल मॅडम चे महाराष्ट्र समावेशित शिक्षण संघाच्यावतीने खूप खूप आभारतसेच  मा.  अजय काकडे  सरमहाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईमी पूर्णवेळ उपस्थित राहून सहकार्य केले यांचेही  खूप खूप आभार,

धन्यवाद…….

 

 

Post a Comment (0)
Previous Post Next Post

Recent Posts

Facebook